Arjun Tendulkar Dropped From Mumbai Indians Playing 11 esakal
IPL

Arjun Tendulkar MI vs RR : बर्थडे बॉय रोहितचे रिटर्न गिफ्ट; हजाराव्या सामन्यात अर्जुन बाहेर अर्शद आत

अनिरुद्ध संकपाळ

Arjun Tendulkar Dropped From Mumbai Indians Playing 11 : वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील 42 वा सामना हा खूप खास आहे. आज आयपीएलचा 1000 वा सामना आहे. तसेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवसही आहे. मात्र याच खास क्षणाला रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का दिला. त्याने आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले. एक बदल हा बेहरनडॉर्फ होता तर दुसरा बदल हा अर्जुन तेंडुलकर!

आयपीएलचा 1000 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. 5 विजेतेपदं पटकावणारी मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे तर राजस्थान आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजते आहेत. त्यामुळे आजचा सामना खास आहे.

त्यातच आज रोहित शर्माचा वाढदिवस असल्याने मुंबईचा संघ आज आपल्या लाडक्या कर्णधाराला विजयी गिफ्ट देण्याच्या तयारीत असणार. मात्र या संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश नाही.

नाणेफेक झाल्यावर रोहितने मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 ची घोषणा केली. यावेळी तो म्हणाला की, 'रवी शास्त्री वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार. खेळपट्टी चांगली दिसत आहे. ती कोरडी आहे. आम्ही प्रथम गोलंदाजीच करणार होतो. आम्ही चेस करणे पसंत करतो.'

'आमची यंदाच्या हंगामातील कामगिरीत चढ उतार राहिला आहे. आमच्याकडे सातत्याची कमतरता आहे. आम्हला चांगलीच विश्रांती मिळाली असून आज आम्ही चांगली कामगिरी करण्याची आशा करतो. आम्ही संघात दोन बदल केले आहेत. जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान संघात आले आहेत. ते बेहरनडॉर्फ आणि अर्जुन तेंडुलकरची जागा घेतील.'

अर्जुन तेंडुलकर जरी प्लेईंग 11 मध्ये नसला तरी त्याचे नाव हे इम्पॅक्ट प्लेअरमध्ये आहे. मात्र मुंबईची पहिली गोलंदाजी असल्याने त्याचा वापर केला जाईल याची शक्यता फार कमी आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT