Arjun Tendulkar SRH vs MI  esakal
IPL

SRH vs MI : अर्जुनने उघडले विकेटचे खाते; मुंबईच्या गोलंदाजांचा प्रभावी मारा, साधली विजयाची हॅट्ट्रिक

अनिरुद्ध संकपाळ

Arjun Tendulkar SRH vs MI : मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा त्यांच्याच मैदानावर 14 धावांनी पराभव करत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 193 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना हैदराबादचा संघ 178 धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. मुंबईकडून बेहरेनडॉर्फ, मेरेडिथ, पियुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आपला दुसरा सामना खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने देखील आज आपला 4 षटकाचा पूर्ण कोटा गोलंदाजी करत 18 धावा देत 1 बळी टिपला. मुंबईने या विजयाबरोबरच गुणतालिकेत 6 गुण घेत सहाव्या स्थानावर झेप घेतली.

मुंबईने ठेवलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात संथ झाली. पहिलेच षटक टाकणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने ब्रुक आणि मयांकला चांगलेच जखडून ठेवले. यामुळे ब्रुकला बेहरेनडॉर्फविरूद्ध धोका पत्करावा लागला आणि इथेच हैदराबादला धक्के बसले. बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर आधी ब्रुक 9 तर राहुल त्रिपाठी 7 धावांवर बाद झाला. अर्जुन तेंडुलकरने पॉवर प्लेमधील दोन षटके चांगली टाकल्याने बेहरेनडॉर्फला त्याचा फायदा झाला.

सुरूवात खराब झाल्यानंतर कर्णधार मारक्रम आणि संथ खेळणाऱ्या मयांकने डाव सावरत संघाला 71 धावांपर्यंत पोहचवले. मात्र ग्रीनने मारक्रमला 22 धावांवर बाद केले. त्यानंतर पियुष चावलाने अभिषेक शर्मला बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला. यानंतर आलेल्या क्लासेनने 16 चेंडूत 36 धावा ठोकत मुंबईला धडकी भरवली. मात्र पियुष चावलानेच त्याचा अडसर दूर करत मुंबईची सामन्यावरील पकड मजबत केली.

दरम्यान, एक बाजू लावून धरलेल्या मयांकला मेरेडिथने 48 धावांवर बाद केले. मेरेडिथने मार्को जेनसेनचीही 13 धावांवर शिकार केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 10 धावांवर धावबाद झाला. अखेर सामना शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 20 धावांची गरज होती. हैदराबादची शेवटच्या दोन विकेट शिल्लक होत्या.

रोहित शर्माने पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केलेल्या अर्जुन तेंडुलकरच्या हातात चेंडू दिला. अब्लुद समाद दुसऱ्याच चेंडूवर धावबाद झाला. त्यानंतर अर्जुनने प्रभावी गोलंदाजी करत षटकाच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला बाद करत आपली आयपीएलमधील पहिली विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT