MI vs PBKS Suryakumar Yadav  esakal
IPL

Arshdeep Singh MI vs PBKS : सूर्या तळपला मात्र अर्शदीपच्या 'स्टम्पतोड' गोलंदाजीमुळे मुंबई पराभवाने झाकोळली

अनिरुद्ध संकपाळ

MI vs PBKS Suryakumar Yadav : पंजाब किंग्जने ठेवलेल्या 215 धावांचे आव्हान पार करताना मुंबईने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मात्र सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, रोहित शर्मा आणि टीम डेव्हिड यांचे प्रयत्न अखेर धावांनी अपुरे ठरले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने स्टम्पतोड गोलंदाजी करत 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या. त्याने शेटवच्या षटकात तिलक वर्मा आणि नेहल वधेराची पाठोपाठ स्टम्प तोडत मुंबईच्या विजयाची आशा धुळीस मिळवली.

पंजाब किंग्जने मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत 215 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईची सुरूवात खराब झाली. इशान किशने 1 धाव करून बाद झाला. मात्र त्यानंतर रोहित शर्माने कॅमरून ग्रीनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची दमदार भागीदारी रचली. परंतु अर्धशतकाजवळ पोहचलेला रोहित शर्मा 27 चेंडूत 44 धावा करून लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

रोहित बाद झाल्यानंतर ग्रीन आणि सूर्यकुमार यादवने मुंबईला 150 शतकी मजल मारून दिली. ग्रीनने 43 चेंडूत 67 धावांची खेळी केली. अखेर ही 75 धावांची ही भागीदारी नेथन एलिसने फोडली. त्याने ग्रीनला 67 धावांवर बाद केले.

यानंतर सूर्याने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत 219.23 च्या स्ट्राईक रेटने पंजाब किंग्जच्या गोलदाजांची धुलाई केली. मात्र अर्शदीप सिंगने 18 व्या षटकात सूर्याची 26 चेंडूत केलेली 57 धावांची खेळी संपवली. सूर्या बाद झाला त्यावेळी मुंबईने 17.4 षटकात 182 धावांपर्यंत मजल मारली होती.

यानंतर टीम डेव्हिडने आक्रमक फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावांची गरज होती. मात्र अर्शदीप सिंगने पहिल्या तीन चेंडूत 1 धावा देत तिलक वर्माची दांडी गुल केली. अर्शदीपच्या यॉर्करने मधली स्टंम्प तुटली. त्यानंतर अर्शदीपने नेहल वधेराची देखील स्टम्प तोडत हॅट्ट्रिक चान्स निर्माण केला.

आता मुंबईला 2 चेंडूत 15 धावांची गरज होती. मात्र अर्शदीपने फक्त 1 धाव देत पंजाबला 13 धावांनी विजय मिळवून दिला. मुंबईला 20 षटकात 6 बाद 201 धावांपर्यंतच मजल मारता आली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT