Hardik Pandya esakal
IPL

Hardik Pandya : हार्दिकसोबतची जोडी फुटल्यानंतर आशिष नेहराची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Ashish Nehra : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ट्रेड डील नुकतीच झाली. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच हंगामात आयपीएल विजेतेपद जिंकले. दुसऱ्या हंगमात फायनल गाठली अन् तिसऱ्या हंगामात हार्दिकनं मुंबईत उडी मारली त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पहिल्या दोन हंगामात हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा यांच्या जोडगोळीची तुफान चर्चा झाली होती. हार्दिक ज्यावेळी भारतीय संघांचा कर्णधार झाला त्यावेळी आता भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार अशी चर्चा सुरू होती. एवढी मजबूत जोडी एका ट्रेड ऑफने तुटली.

दरम्यान, आता आशिष नेहराने हार्दिक गुजरात सोडून गेल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. जिओ सिनेमावर बोलताना आशिष नेहरा म्हणाला, 'हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतल्याने खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला असं नाही. तो त्या संघाकडून अनेक वर्षे खेळत होता. त्याने तेथे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली.'

आशिष नेहरानेच 2022 मध्ये हार्दिक पांड्याला नवीन संघ गुजरात टायटन्समध्ये सामील होण्यासाठी फोन करून तयार केलं होतं. आशिष नेहरा म्हणाला की गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला रिटेन करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र पांड्याला मुंबईं इंडियन्समध्ये जायचंच होतं. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला रिलीज केलं.

आशिष नेहरा म्हणाला की, 'आमच्या संघ व्यवस्थापनाचं नेचर असं आहे की जर खेळाडूला तिकडं जायंच असेल तर त्याला आम्ही थांबवत नाही. तो तिकडे जाऊन खूष असले म्हणूनच तो गेला असेल. हार्दिकची रिप्लेसमेंट मिळणं अवघड आहे. मात्र आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले.'

गुजरात टायटन्स यंदाच्या लिलावात सर्वात मोठी पर्स घेऊन उतरली होती. मात्र त्यांना हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट मिळवण्यात यश आलं नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT