India vs Pakistan Asia Cup 2023 sakal
IPL

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 रद्द? पाकिस्तान हट्टी तर BCCI ने केली मोठा प्लॅन

आशिया चषक 2023 कुठे खेळायचा या वरून जवळपास 7 महिन्यांपासून वाद सुरू आहे आता...

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 कुठे खेळायचा या वरून जवळपास 7 महिन्यांपासून वाद सुरू आहे. पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद आहे, परंतु मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकीय कोंडी झाली आहे. याचा दाखला देत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ऑक्टोबरमध्येच टी-20 विश्वचषक 2022 दरम्यान या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा वाद सुरू झाला.

पीसीबीचे तत्कालीन प्रमुख रमीझ राजा यांनी यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप न खेळण्याची धमकी दिली. कार्यवाहक अध्यक्षाची भूमिका सध्या नजम सेठी करत आहेत. ते आल्यानंतरही हा वाद मिटला नाही. आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यात आशिया कप 2023 रद्द होऊ शकतो अशी चर्चा आहे.

क्रिकेट पाकिस्तान या वेबसाइटने याबाबत संपूर्ण माहिती शेअर केली आहे. या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान आपल्या आडमुठेपणावर ठाम आहे. त्यानंतर ही स्पर्धाही रद्द होऊ शकते. एवढेच नाही तर आशिया चषक रद्द झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्या विंडोमध्ये पाच देशांदरम्यान बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णयही घेतला असल्याचे त्या अहवालात म्हटले आहे.

सध्या हा वाद पाहता बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही पाकिस्तानची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि ही स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. गेल्या वर्षी ही स्पर्धा UAE मध्ये आयोजित करण्यात आली होती.

आशिया कप 2023 रद्द होण्याच्या मार्गावर आहे. यासोबतच बीसीसीआयनेही त्या रिकाम्या वेळेत स्पर्धा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. या अंतर्गत पाच देशांदरम्यान बहुराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतात. पण असे झाल्यास पाकिस्तानच्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीलाच धक्का बसणार नाही, तर आंतरराष्ट्रीय आणि क्रिकेटच्या महसुलाच्या दृष्टीनेही त्याचे नुकसान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : मला सूर्या भाईचा फोन आला अन्...; हर्षित राणा संघातून बाहेर पडताच पडद्यामागे काय घडलं? सिराजने सांगितला 'तो' किस्सा, पाहा VIDEO

Horoscope : नव्या आठवड्याची सुरुवात, नवे फायदे! उद्यापासून 'या' 6 राशींना अचानक मिळणार पैसे; पूर्ण होणार जुनी इच्छा

Video : आणि तन्वीने सगळ्यांसमोरच आयुषला मारलं ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "ही तर प्रेमात पडलीये"

US Poverty Video : जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेतही आहे भयंकर गरिबी; व्हिडिओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

Latest Marathi News Live Update : भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज

SCROLL FOR NEXT