Axar Patel DC vs KKR esakal
IPL

DC vs KKR : केकेआरने वातावरण केलं टाईट; अखेर अक्षरने दिल्लीचा पहिला विजय खेचून आणला, वॉर्रनची कळी खुलली

अनिरुद्ध संकपाळ

Axar Patel DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचे 128 धावांचे माफक आव्हान पार करताना देखील दिल्लीची हवा टाईट झाली होती. केकेआरने दिल्लीचे 6 फलंदाज बाद करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. अखेर अक्षर पटेलने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवत दिल्लीला विजय मिळवून दिला. अक्षरने 21 चेंडूत 21 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 54 धावांची तर मनिष पांडेने 21 धावांची खेळी केली. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती, अनुकूल रॉय आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत दिल्लीला घाम फोडला.

केकेआरने ठेवलेल्या 128 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीला डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी आक्रमक सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र ही सलामी जोडी 38 धावांवर पोहचली असताना वरूण चक्रवर्तीने 13 धावांवर खेळणाऱ्या पृथ्वी शॉला बाद केले.

यानंतर वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दिल्लीचे अर्धशतक पूर्ण केले. यात वॉर्नरचा मोठा वाटा होता. मात्र नितीश राणाने मार्शला 2 धावांवर बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. यानंतर अनुकूल रॉयने फिलिप्स सॉल्टला 5 धावांवर माघारी धाडले. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती.

त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला 11 षटकात 83 धावांपर्यंत पोहचवले. मात्र अर्धशतकानंतर वरूण चक्रवर्तीने वॉर्नरला 54 धावांवर बाद केले. वॉर्नर बाद झाल्यानंतर सामना बॉल टू रन असा आला. क्रिजवर मनिष पांडे आणि अक्षर पटेल होते. या दोघांनी दिल्लीला शतक पार करून दिले. मात्र विजयासाठी 19 धावांची गरज असताना मनिष पांडे 21 धावा करून बाद झाला. त्याला अनुकूल रॉयने बाद केले.

पाठोपाठ अमन हकीम खान देखील भोपळाही न फोडता माघारी गेला. त्याला नितीश राणाने बाद केले. 18 धावात दिल्लीचे तीन फलंदाज बाद झाल्याने दिल्लीच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण टाईट झालं होतं.

सामना आता 12 चेंडूत 12 धावा असा आला होता. 19 वे षटक टाकण्यासाठी कर्णधार नितीश राणा सरसावला. अक्षर आणि ललितने पहिल्या चार चेंडूवर 4 धावा घेतल्या. त्यानंतर अक्षरने पाचवा चेंडू मिस केला. तो यष्टीचित होता होता वाचला. अक्षरने नितीन राणाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवले.

आता शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 7 धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी कुलवंत खेजरोलियवर सोपवण्यात आली. अक्षरने पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेतल्या. दुसऱ्या चेंडूवरही अक्षरने 2 धावा घेतल्या. त्यात कुलवंतने नो बॉल टाकल्याने एक अतिरिक्त धाव आणि फ्री हिट देखील मिळाली. विजयासाठी 5 चेंडूत 2 धावांची गरज असताना अक्षरने 2 धावा पळून काढत सामना जिंकून दिला.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT