IPL 2023 BCCI Workload Management esakal
IPL

IPL 2023 : सर्वांचा वर्कलोड 'मॅनेज' होतोय मात्र BCCI ने शमी, सिराजवरचा ताण केलाय डबल

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 BCCI Workload Management : आयपीएल 2023 ची नुकतीच सुरूवात झाली आहे तोपर्यंतच बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना नव्या सुचना केल्या आहेत. बीसीसीआयने आयपीएल सुरू होण्यापूर्वी फ्रेंचायजी आणि एनसीएला भारतीय क्रिकेटपटूंच्या वर्कलोड मॅनेज करण्यास सांगितले होते. आता बीसीसीआने भारतीय संघातील मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि इतर गोलंदाजांना त्यांचा वर्कलोड वाढवण्यास सांगितला आहे.

बीसीसीआयने हा निर्णय 7 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला समोर ठेवून घेतला आहे. बीसीसीआयने करारबद्ध गोलंदाजांना आयपीएल दरम्यान त्यांचा वर्कलोड वाढवण्यास सांगितले आहे. आयपीएलचा अंतिम सामना आणि WTC चा अंतिम सामना यांच्यात फक्त 1 आठवड्याचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि इतर गोलंदाजांना ड्युक बॉलवर आठवड्याला 33 षटके टाकण्यास सांगितले आहे. ड्युक बॉल हा इंग्लंडमध्ये वापरण्यात येतो.

याबाबत बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला की, 'दोन्ही चेंडू खूप वेगळे आहेत. यामुळे सराव व्हावा यासाठी खेळाडूंचा वर्कलोड वाढवणे गरजेचे होते. त्यांना WTC फायनलसाठी तयारी करायला फक्त एक आठवडा मिळणार आहे. नक्कीच त्याच्या फ्रेंचायजीमधील फिजिओंना त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. ते थेट वर्कलोड बाबत एनसीएला रिपोर्ट करणार आहेत.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT