IPL 2024 Team Photo News Marathi sakal
IPL

IPL 2024 मध्ये होणार मोठी उलथापालथ! 'या' 7 संघांच्या कर्णधारांना केले जाणार बॅन?

BCCI Fines on Slow Over Rate : आयपीएल 2024 मध्ये दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. पण लवकरच मोठी उलथापालथ होऊ शकते.

Kiran Mahanavar

BCCI Fines on Slow Over Rate : आयपीएल 2024 मध्ये दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. पण लवकरच मोठी उलथापालथ होऊ शकते. बीसीसीआय आयपीएलच्या कर्णधारांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आयपीएल 2024 दरम्यान केवळ एक किंवा दोन फ्रँचायझींच्या नाही तर एकूण 7 संघांच्या कर्णधारांवर बंदी घातली जाऊ शकते. कालपर्यंत या यादीत केवळ 5 कर्णधारांची नावे होते, ज्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते. परंतु आता या नको असलेल्या यादीत आणखी 2 कर्णधारांची नावे समाविष्ट झाला आहे.

चेन्नई आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि केएल राहुल यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. या सामन्यानंतर बीसीसीआयने दोन्ही कर्णधारांवर प्रत्येकी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

स्लो ओव्हर रेटसाठी दोघांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने 5 कर्णधारांवर हा दंड ठोठावला होता. हार्दिक पांड्या, शुभमन गिल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि केएल राहुल यांच्या नावांचा या विशेष यादीत समावेश आहे.

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच स्लोओव्हर रेटमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. दुसऱ्यांदा कर्णधाराला 24 लाख रुपये आणि संघातील खेळाडूंना 6 लाख. जर ही चुक तिसऱ्यांदा झाली तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते.

या यादीत समाविष्ट असलेल्या कर्णधारांपैकी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला सर्वात जास्त टेन्शन आहे. कारण पंतला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे, आता जर पंतला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. बीसीसीआयच्या निर्णयामुळे आयपीएलमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT