Kolkata Knight Riders X/IPL
IPL

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Harshit Rana Ban: बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजावर नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंदीची कारवाई केली आहे.

Pranali Kodre

Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (29 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला होता. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 7 विकेट्सने विजय मिळवला.

मात्र असे असले तरी कोलकाताला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर बीसीसीआयने बंदीची कारवाई केली आहे. त्याने आयपीएलच्या आचार संहितेतील नियमाचा भंग केल्याप्रकारणी त्याच्यावर एक सामन्याची बंदी आणि सामना शुल्काच्या (Match Fee) 100 टक्के दंड सोपवण्यात आला आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार राणाने आयपीएल आचार संहितेतील कलम 2.5 अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केला आहे.

कलम 2.5 दुसऱ्या खेळाडूविरुद्ध चूकीची भाषा वापरणे, कृती करणे किंवा त्या खेळाडूला आक्रमक प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवृत्त करण्याबद्दल आहे. याशिवाय बाद झालेल्या फलंदाजाविरुद्ध अतिआक्रमक सेलिब्रेशन करण्याबद्दल किंवा त्याच्याविरुद्ध अभद्र भाषा वापरण्याबद्दलही आहे.

दरम्यान, हर्षित राणाने नक्की काय चूक केली, याबाबत बीसीसीआयने माहिती दिलेली नाही. मात्र, त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमावरून तरी त्याने अभिषेक पोरेलला बाद केल्यानंतर केलेल्या कृतीमुळे त्याच्यावर ही कारवाई झाली असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.

दिल्लीचा फलंदाज अभिषेक पोरेलला त्रिफळाचीत केल्यानंतर राणाने डगआऊटच्या दिशेने इशारा करत सेंड-ऑफ दिला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झाल्याची शक्यता आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की याच कलमाअंतर्गत त्याच्यावर यापूर्वीही कारवाई झाली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही त्याने मंयक अगरवालला फ्लाईंग किस देत सेंड-ऑफ दिला होता. त्यावेळीही त्याच्यावर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली होती. आता अशीच चूक त्याच्याकडून दुसऱ्यांदा झाली आहे.

दरम्यान, हर्षित राणाने बीसीसीआयची कारवाई मान्य केली आहे. त्याने दिल्लीविरुद्ध 2 विकेट्स घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते आरती

Mumbai Rain Update : मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीवर पावसाचं सावट! हवामान खात्याने दिली महत्त्वाची अपडेट, पहाटेपासून शहरात ढगाळ वातावरण

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Latest Maharashtra News Updates : मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT