Jasprit Bumrah
Jasprit Bumrah 
IPL

Jasprit Bumrah : 202 दिवसांची प्रतीक्षा संपली! बुमराह या दिवशी परतणार मैदानात; BCCI दिले अपडेट

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah Injury : भारतीय क्रिकेट संघाचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडिया आणि आयपीएल मधून बाहेर आहे. सध्या देशात आयपीएल सुरू आहे आणि त्यानंतर टीम इंडियाला WTC फायनल खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघ आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करेल. पण टीम इंडियाचा प्राणघातक गोलंदाज जसप्रीत बुमराह 2023 च्या वर्ल्ड कपपर्यंत फिट होईल का? या विषयावर बीसीसीआयने त्याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट शेअर केले आहे.

जसप्रीत बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियासोबत 25 सप्टेंबर 2022 मध्ये खेळला होता. या मालिकेपूर्वीही तो जखमी झाला होता आणि त्यानंतर या मालिकेने तो आणखी जखमी झाला. अशा स्थितीत आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असली तरी तो विश्वचषक खेळू शकतो, असा विश्वास बीसीसीआयला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, जसप्रीत बुमराह आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023पूर्वी फिट होऊ शकतो. बीसीसीआयला विश्वास आहे की बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि त्याच्या रंगात दिसेल.

मात्र, तो लवकरात लवकर मैदानात परतेल अशी आशाही भारतीय चाहते व्यक्त करत आहेत. आगामी विश्वचषकाचे यजमानपद भारताच्या खांद्यावर आहे आणि अशा स्थितीत टीम इंडिया हा विजयाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. त्याचबरोबर बुमराहचा संघात समावेश करण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करेल.

जसप्रीत बुमराहच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. भारताकडून बुमराहने 30 कसोटी सामने खेळताना 128 विकेट्स तर 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने टी-20 च्या 60 सामन्यात 70 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.62 राहिला आहे. आयपीएलच्या 120 सामन्यांत त्याने 145 विकेट्स घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT