bcci punishes-amit mishra-for-breaching-code-of-conduct-during-srh-vs-lsg-clash-in-ipl-2023 cricket news in marathi  
IPL

IPL 2023 : BCCIने अमित मिश्राला फटकारले; LIVE सामन्यात केली ही मोठी चूक

अमित मिश्राने केली मोठी चूक अन्...

Kiran Mahanavar

IPL 2023 Amit Mishra : आयपीएल 2023 च्या 58 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौ संघाने शेवटच्या षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. पण या सामन्यात लखनौचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने मोठी चूक केली, त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून फटकारले.

हैदराबादच्या फलंदाजीच्या वेळी अमित मिश्राने लखनौसाठी 9वे षटक टाकले. त्यानंतर या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने मिश्राला षटकार ठोकला. त्यावेळी मिश्रा खूपच नाराज दिसत होते. पुढच्या चेंडूवर मार्करामने एक धाव घेत अनमोलप्रीत सिंगला स्ट्राईक दिली.

त्यानंतर पुढच्या चेंडूवर अनमोलने सरळ शॉट खेळला आणि चेंडू थेट मिश्राच्या हातात गेला. हा फलंदाज बाद होताच अमित मिश्रा इतका संतापला की त्याने चेंडू खेळपट्टीत फेकला. यासाठी अमित मिश्राला लाइव्ह मॅचदरम्यान अंपायरने आणि सामन्यानंतर बीसीसीआयने फटकारले आहे.

बीसीसीआयने एका निवेदनात लिहिले की, लखनौ सुपरजायंट्सचा अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज अमित मिश्राला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. लेग-स्पिनरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत 'लेव्हल 1' गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिश्रा यांनी आपली चूक मान्य केली. आयपीएलच्या एका विधानानुसार सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि 'लेव्हल 1' आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मोदी सरकारला धक्का! निवडणूक आयुक्तांबाबतच्या कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाची नोटीस, मागितलं उत्तर

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला वर्ल्ड कप स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी; विराट, शिखर, शुभमन यांचे विक्रम तुटणे निश्चित

Labor Law Changes: Layoff झाला तरी खात्यात पैसे येणार? ‘पुनर्कौशल्य निधी’मुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Kolhapur Election : ‘लाडकी बहीण’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला बहिणीच धडा शिकवतील; खासदार धनंजय महाडिकांचा थेट हल्लाबोल

Mohol Politics: स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपचे दोन डझन इच्छुक; उपनगराध्यपदाची लॉटरी कोणाला लागणार? मोहोळकरांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT