BCCI IPL 2024 Esakal
IPL

IPL 2024 : बीसीसीआयनं आयपीएल संघमालकांसोबत बोलावली अचानक बैठक; कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?

आयपीएलचे भविष्य आणि नियमांवर मंथन; अचानक बैठकीचे आयोजन

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 BCCI Franchise Owner Meeting : बीसीसीआयने आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू असतानाच अचानक आयपीएल संघ मालकांची एक बैठक बोलवली आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये 16 एप्रिल रोजी होणार आहे. याबाबतची माहिती क्रिकबझने दिली. या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णयाबाबत चर्चा होणार आहे. यात प्रामुख्याने आयपीएलचं भविष्य आणि खेळाडूंच्या रिटेंशन, लिलाव आणि सॅलरी कॅपबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने प्रत्येक फ्रेंचायजी मालकांना बैठकीचं निमंत्रण पाठवलं आहे. प्रत्येक संघ मालकांना हे आमंत्रण पोहचलं देखील आहे. हे सर्व संघ मालक आपल्या सीईओ आणि कार्यकारी स्टाफसह बैठकीला हजर राहतील अशी अपेक्षा आहे. याचबरोबर फक्त संघ मालकांसोबत देखील वेगळी बैठक याचवेळी होणार आहे.

या बैठकीला अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा आणि आयपीएल चेअरमन अरूण सिंह धुमल हे बीसीसीआयचे अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. या बैठकीचा अधिकृत अजेंडा अजून जाहीर झालेला नाही. आयपीएल सीईओ हेमंग अमिन यांनी या बैठकीचे आमंत्रण दिले आहे. त्यांच्या मते या बैठकीत मेगा लिलावासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर देखील चर्चा होईल. मात्र अजून अधिकृतरित्या बैठकीचा अजेंडा घोषित करण्यात आलेला नाही.

सूत्रांनी क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार 'या बैठकीत आयपीएलची पुढची दिशा कशी असेल यावर चर्चा होईल.' आता या बैठकीत नेमकं काय होईल याची उत्सुकता सर्व आयपीएल प्रेमींना लागून राहिली आहे. कारण प्रत्येक आयपीएल संघ मालकाचा वेगळा दृष्टीकोण असेल.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT