BCCI takes action against Gujarat Titans captain Shubman Gill sakal
IPL

GT vs CSK : शतक ठोकल्यानंतर BCCIने गिलवर घेतली मोठी ॲक्शन! एका चुकीमुळे झाले लाखोंचे नुकसान

BCCI takes action against Shubman Gill : आयपीएलमध्ये काल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव केला.

Kiran Mahanavar

BCCI takes action against Shubman Gill : आयपीएलमध्ये काल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

दरम्यान, बीसीसीआयने गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला मोठा झटका दिला आहे. खरं तर, शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल शुभमन गिलला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

बीसीसीआय आणि आयपीएलने दंडाची पुष्टी करणारे एक निवेदन जारी केले, हे लक्षात घेतले की, आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा संघाचा हंगामातील दुसरा गुन्हा होता, जो स्लो ओव्हर रेटच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. त्यामुळे या उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन गिलला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त आयपीएल नियमांनुसार, उर्वरित सदस्यांना वैयक्तिक 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के दंडाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने पुन्हा एकदा या नियमाचे उल्लंघन केल्यास गिलवर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल.

या सामन्यात गुजरात टायटन्सकडून सलामीला आलेल्या साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी शानदार शतके झळकावली. साई सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावांची खेळी केली. तर गिलने 55 चेंडूत 104 धावांची खेळी केली होती. अशा प्रकारे त्याने 231 धावा केल्या.

प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला 8 गडी गमावून 196 धावाच करता आल्या. डॅरिल मिशेल आणि मोईन अली यांनी शानदार फलंदाजी केली. अलीने 36 चेंडूत 56 धावा केल्या तर डॅरिल मिशेलने 63 धावांची खेळी केली. याशिवाय कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला त्याच्या उत्कृष्ट शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : राष्ट्रवादी अन् मविआ पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढणार? अजितदादांचा सतेज पाटील यांना फोन

हृदयद्रावक! भीषण अपघातात मामा-भाचीनंतर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू; कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी विजयी उमेदवारांचा सत्कार

Kolhapur Flashback : रिक्षाचालकांचा घेराओ, सभात्याग आणि गुप्त खेळी; १९८० ची महापौर निवडणूक इतिहासजमा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT