IPL 2023 Jos Buttler Fined
IPL 2023 Jos Buttler Fined  
IPL

IPL 2023 : एक छोटीशी चूक पडली महागात! राजस्थानच्या विजयानंतरही या खेळाडूवर BCCIने घेतली ॲक्शन

Kiran Mahanavar

IPL 2023 Jos Buttler Fined : आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात गुरुवारी सामना झाला. जिथे केकेआरला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सने हा सामना 41 चेंडू बाकी असताना 9 गडी राखून जिंकला. जिथे केकेआरविरुद्धच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा टॉप 4 मध्ये प्रवेश केला.

पण यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला आयपीएलचा एक मोठा नियम मोडल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. एक छोटीशी चूक या संघाच्या खेळाडूला खूप महागात पडली आणि आता त्याला दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागणार आहे.

आयपीएलमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या खेळाडूला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला जात आहे. आता राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर जोस बटलरही यातून सुटलेला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेटचा नियम मोडल्याबद्दल कर्णधारांवर सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र आयपीएलचा आणखी एक नियम मोडल्याबद्दल जोस बटलरला यावेळी दंड ठोठावण्यात आला आहे. जोस बटलरला आता आयपीएलमध्ये मोठा दंड भरावा लागणार आहे.

ईडन गार्डन्स येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल 2023 च्या 56व्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला दंड ठोठावण्यात आला. आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले, दंडाच्या 10 टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. बटलरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 नियमांचे उल्लंघन केले आहे.

सामन्याच्या दुसऱ्या डावात केकेआरने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरआरचा संघ मैदानात उतरला, तेव्हा जैस्वालने त्याचा सहकारी जोस बटलर धावबाद केला. बाद झाल्यावर बटलर मैदानाबाहेर जात असताना त्याने रागाने आपल्या बॅटने सीमारेषेवर दोरी मारली. त्यामुळे त्याला आयपीएलने दंड ठोठावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT