IPL Cricket Betting sakal media
IPL

IPL मध्ये सट्टा लावणाऱ्या दोघांची तब्बल ९ वर्षांनी पुराव्याअभावी सुटका

आयपीएल 2013 मध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या दोन आरोपींची सुटका

Kiran Mahanavar

IPL Betting Case: आयपीएल 2013 मध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या दोन आरोपींची सुटका झाली आहे. मुंबईच्या सेशल कोर्ट मध्ये हा निर्णय घेतला गेला आहे. पुराव्याअभावी सेशल कोर्टने 9 वर्षांनंतर दोघांची सुटका केली आहे. मुंबई क्राइम ब्रँचने 9 वर्षांपूर्वी आयपीएल लीग मध्ये सट्टेबाजीचा गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी अनेक मोठ्या लोकांना गुन्हे शाखेने अटक केले होते. याच प्रकरणात संजय छाबड़ा आणि संदीप छाबड़ा या दोघांवर पण गुन्हा दाखल करण्यात आला होता. 14 आणि 15 मे 2015 रोजी ज्या हॉटेलमधून सट्टेबाजी सुरू होती ती खोली त्यांच्या नावावर बुक केली होती.

मॅच फिक्सिंगमध्ये या दोघांबरोबर आजून काही लोक पण सामील होते. असं आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. ज्यात आंतरराष्ट्रीय पंच असद रऊफचे पण नाव समोर आले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर दोघांना पण कनिष्ठ न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्याने सत्र न्यायालयात धाव घेतली.

सत्र न्यायालयाने दोघांना दोषमुक्त करताना निकालात नमूद केले की, पंच असद रऊफ आणि दोन आरोपींमधील कथित संभाषण होत. त्यांच्यातील संभाषण दर्शवण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले गेले नाही. एका मेसेजमध्ये रऊफ आणि आरोपींपैकी एकाने यांच्यात संभाषण केले होते, ज्यामध्ये सट्टेबाजीसाठी कोणतीही रक्कम निश्चित केल्याचे कुठेही दिसून आलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT