IPL 2024 Jos Buttler sakal
IPL

IPL 2024 Jos Buttler : बटलर सर्वोत्तम सलामी फलंदाज ; कुमार संगकारा

विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत; पण राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी जॉस बटलर याचे कौतुक करताना म्हटले की, बटलर हा सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामी फलंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

जयपूर : विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत; पण राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी जॉस बटलर याचे कौतुक करताना म्हटले की, बटलर हा सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामी फलंदाज आहे.

जॉस बटलर याने शनिवारी झालेल्या लढतीत अवघ्या ५८ चेंडूंमध्ये शतकी खेळी साकारत राजस्थानला बंगळूरवर दमदार विजय मिळवून दिला. याच पार्श्वभूमीवर संगकारा म्हणाले, बटलर हा अव्वल दर्जाचा सलामी फलंदाज आहे. सुमार फॉर्ममधून जात असताना त्याने टीकाकारांकडे लक्ष देऊ नये. त्याच्याकडून आपसूकच छान खेळ होऊ शकतो.

दरम्यान, जॉस बटलरने शतकी खेळीनंतर आपले मत व्यक्त करताना म्हटले की, तुम्ही अधिक वर्षे क्रिकेट खेळल्यानंतरही दबाव व चिंता सतावत असते. एखादप्रसंगी स्वत:च्या मनाला समजावून सांगतो; पण अधिक मेहनत करण्याला पर्याय नसतो. मागील लढतीत माझ्याकडून छान फलंदाजी झाली नाही. त्यामुळे निराश होतो.

१० ते १५ धावा कमी पडल्या : ड्युप्लेसी

राजस्थानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बंगळूर संघाचा कर्णधार फाफ ड्युप्लेसी म्हणाला, राजस्थानला नाणेफेक जिंकल्याचा फायदा झाला. दुसऱ्या डावात मैदानात दव पडल्याचा फटका आम्हाला बसला. गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. आम्हाला आणखी १० ते १५ धावा अधिक करायला हव्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT