Venkatesh Iyer X/KKRiders
IPL

KKR: 'माहीभाईचं घर दिसतंय का?' रांचीवरून विमान जात असताना उत्साही वेंकटेश अय्यरचा प्रश्न, Video होतोय व्हायरल

Kolkata Night Rideirs: कोलकाता नाईट रायडर्सने कोलकाताहून अहदाबादला प्रवास करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून यात खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत.

Pranali Kodre

Venkatesh Iyer Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 12 सामन्यांमधील 9 सामन्यांत विजय मिळवले असून ३ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे त्यांचे 18 गुण झाले असून त्यांनी प्लेऑफमधील प्रवेशही पक्का केला आहे.

दरम्यान, आता कोलकाता नाईट रायडर्सचे आणखी दोन साखळी सामने बाकी आहेत. त्यांचा पुढचा सामना सोमवारी (13 मे) गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादला होणार आहे.

दरम्यान, प्लेऑफसाठी पात्र ठरलेले असल्याने सध्या कोलकाता संघात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या संघात असलेला उत्साह त्यांच्या प्रवासादरम्यानही दिसून आला आहे.

कोलकाता संघाने सोशल मीडियावर कोलकातामधून अहमदाबादला जातानाच्या प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये प्रवासादरम्यान काही खेळाडू पत्ते, काही खेळाडू मोबाईल गेम खेळताना दिसत आहेत. तर एकावेळी विमानाचा पायलेट माहिती देतो की 'विमानाच्या डाव्या बाजूला जमशेदपूर आहे, तर उजवीकडे रांची आहे.' त्यानंतर कोलकाताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर उत्साहाने म्हणाला, 'येथून आपल्याला माहीभाईचं घर दिसतं का?'

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीचं टोपननाव माही असून तो रांचीचा रहिवासी आहे. यानंतर तो मस्तीने असंही सांगतो की त्याच्या मोबाईलचा चार्जरही हॉटेलरुममध्ये राहिला आहे. त्यामुळे त्यांना विचारा की ते वर फेकू शकतात का? आपण इतके खालून चाललो आहे.'

दरम्यान, कोलकाताच्या गेल्या सामन्याबद्दल सांगायचं झालं, तर पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात कोलकाताने शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध 18 धावांनी विजय मिळवला. या विजयासह त्यांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. आता आणखी एक जरी विजय त्यांनी मिळवला, तर ते पहिल्या दोन क्रमांकावरील स्थान पक्के करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT