Ruturaj Gaikwad - MS Dhoni | CSK vs KKR | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: 'तेव्हाही माही भाई माझ्याबरोबर...', CSK साठी विजयी चौकार ठोकल्यानंतर कॅप्टन ऋतुराज झाला भावूक

Ruturaj Gaikwad: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपली प्रतिक्रिया देताना जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

Pranali Kodre

IPL 2024, CSK vs KKR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी झालेल्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला.

हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानात म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर झाला, त्यामुळे चेन्नईने यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. चेन्नईने १७ व्या आयपीएल हंगामात आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून 3 विजय मिळवले आहेत. हे तिन्ही विजय चेन्नईने घरच्या मैदानावर मिळवले आहेत.

दरम्यान, सोमवारी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजयी चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी त्याच्याबरोबर नॉनस्ट्रायकर एन्डला चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी होता. त्यामुळे ऋतुराजच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. याबद्दल त्याने सामन्यानंतर सांगितले आहे.

ऋतुराज म्हणाला, 'माझ्या काही आठवणी ताज्या झाल्या. मी माझे पहिले आयपीएलमधील अर्धशतक केले, तेव्हा माही भाई सामना संपवण्यासाठी माझ्याबरोबर होता आणि आताही तो माझ्याबरोबर होता.'

सलामीला फलंदाजीला आलेल्या ऋतुराजने 58 चेंडूत 67 धावांची नाबाद खेळी केली आणि चेन्नईला विजयापर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला.

त्याने त्याच्या खेळीबद्दल सांगितले 'अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त होता, त्यामुळे शेवटपर्यंत फलंदाजी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती, मला युवा खेळाडूंना कठीण परिस्थित टाकायचे नव्हते. मी असं म्हणणार नाही की माझी सुरुवात संथ होत आहे, टी20मध्ये अनेकदा एक-दोन चेंडूत गोष्टी पलटतात. कधीकधी पुढे जाण्यासाठी तुम्हाला थोड्या नशीबाचीही साथ हवी असते.'

तसेच या सामन्यात चेन्नईच्या विजयात रविंद्र जडेजानेही मोलाचा वाटा उचलला. त्याने गोलंदाजी करताना 18 धावाच देत 3 विकेट्स घेण्याबरोबरच 2 झेलही घेतले. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

त्याच्या कामगिरीबद्दल ऋतुराज म्हणाला, 'जडेजा नेहमीच पॉवर-प्लेनंतर येऊन फिरकी गोलंदाजी विभागात एक लय तयार करतो.'

एमएस धोनीने नेतृत्व सोडल्यानंतर ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतली आहे. तो म्हणाला,'या संघाबद्दल सांगायचे झाले, तर मला कोणाला फार काही सांगायची गरज पडत नाही. सर्वजण चांगल्या लयीत आहे. माही भाई आणि स्टिफन फ्लेमिंग अजूनही माझ्याबरोबर निर्णय घेण्यासाठी आजुबाजूला आहेत.'

या सामन्यात कोलकाताने 20 षटकात 9 बाद 137 धावा केल्या होत्या. त्यानंतर 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 17.1 षटकात 3 विकेट्स गमावत 141 धावा करून पूर्ण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT