Chennai Super Kings Defeat Delhi Capital Reached Play Off  esakal
IPL

DC vs CKS Play Offs : प्ले ऑफ गाठलं! धोनी आता चेन्नईत हार्दिकचा करणार पाहुणचार? वॉर्नरने केला WTC Final चा सराव

अनिरुद्ध संकपाळ

Chennai Super Kings Defeat Delhi Capital Reached Play Off : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा धावांनी पराभव केला. चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी 224 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र सीएसकेने दिल्लीला 146 धावात गुंडाळले. चेन्नईने 77 धावांनी सामना जिंकत थाटात प्ले ऑफ गाठले.

या विजयाबरोबरच चेन्नईन सुपर किंग्जने 17 गुण पटकावत प्ले ऑफचे आपले तिकीट पक्के केले. सध्या चेन्नईन दुसऱ्या स्थानावर आहे. आज जर लखनौ सुपर जायंट्स केकेआरकडून सामना हरली तर चेन्नई 23 मे रोजी गतविजेत्या गुजरातचा आपल्या घरच्या मैदानावर पाहुणचार करेल.

चेन्नई सुपर किंग्जने विजयासाठी ठेवलेल्या 224 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ 5 धावा करून तुषार देशपांडेची शिकार झाला. त्यानंतर आलेला फिल्प सॉल्ट 3 धावांची भर घालून परतला. त्याला दीपक चाहरने बाद केले. दीपकने पुढच्याच चेंडूवर रायली रूसोला भोपळाही न फोडता माघारी धाडले.

दिल्लीची अवस्था 3 बाद 26 धावा अशी झाली असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने डाव सावरला. त्याने आक्रमक फलंदाजी करत दिल्लीला 11 व्या षटकात 75 धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्याला साथ देणारा यश धूल 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत दिल्लीला शतकी मजल मारून दिली. मात्र 8 चेंडूत 15 धावा केल्यानंतर दीपक चाहरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, अर्धशतक पूर्ण केलेला वॉर्नर सत्तरीत पोहचला होता.

डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत 86 धावांची झुंजार खेळी करत दिल्लीला 140 धावांच्या पार पोहचवले. मात्र दुसऱ्या बाजूने कर्णधाराला कोणाचीही साथ लाभली नाही. अखेर चेन्नईने दिल्लीला 20 षटकात 9 बाद 146 धावात रोखत आपले प्ले ऑफचे तिकीट नक्की केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT