CSK vs KKR | IPL 2024 Sakal
IPL

CSK vs KKR, Head-to-Head: ऋतुराजच्या चेन्नईपुढे अपराजित कोलकाताचं आव्हान; जाणून घ्या आत्तापर्यंत कोणचं पारडं राहिलंय जड

IPL 2024, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 च्या 22 व्या सामन्यात आमने-सामने येणार आहे.

Pranali Kodre

CSK vs KKR, Head-to-Head: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना होणार आहे. हा सामना आयपीएलमधील 22वा सामना असून एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ पुन्हा घरच्या मैदानावर खेळताना दिसणार असून या सामन्यातून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.

चेन्नईने घरच्या मैदानावर पहिले दोन सामने जिंकल्यानंतर मात्र दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध सामने पराभूत झाले. हे दोन्ही सामने चेन्नईने प्रतिस्पर्धींच्या घरच्या मैदानात खेळले होते. त्यानंतर आता चेन्नई पुन्हा घरच्या मैदानात खेळणार आहे.

तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाबद्दल सांगायचे झाले, तर कोलकाताने आत्तापर्यंत १७ व्या आयपीएल हंगामात 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यात विजय मिळवले आहेत.

यातील एक विजय कोलकाताने घरच्या मैदानावर मिळवला आहे, तर इतर दोन विजय प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानात मिळवला आहे. कोलकाताने आत्तापर्यंत सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना पराभूत केले आहे.

आता कोलकाताला चेन्नईमध्ये सामना खेळायचा आहे. या सामन्यातून आपला विजयी रथ कायम ठेवण्यासाठी कोलकाता प्रयत्नशील असेल.

आमने-सामने आकडेवारी

चेन्नई आणि कोलकाता संघ आत्तापर्यंत 29 वेळा आयपीएलमध्ये आमने-सामने आले आहेत. यातील 18 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर 10 सामने कोलकाताने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला आहे.

गेल्या तीन हंगामात या दोन संघात झालेल्या 6 सामन्यांमध्ये 4 वेळा चेन्नईने विजय मिळवला आहे, तर 2 वेळ कोलकाने विजय मिळवला आहे.

तसेच कोलकाताविरुद्ध चेन्नईची 235 धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे, तर कोलकाताची चेन्नईविरुद्ध 202 धावांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

यातून निवडले जातील प्लेइंग इलेव्हन -

  • चेन्नई सुपर किंग्स - रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिशेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मिचेल सँटेनर, समीर रिझवी, डेवॉन कॉनवे, मुस्तफिझूर रहमान, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगारगेकर, मथिशा पाथीराना, निशांत सिंधू, अरावेली अवनीश

  • कोलकाता नाईट रायडर्स - फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, सुयश शर्मा, मनीष पांडे , रहमानउल्ला गुरबाज, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, नितीश राणा, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसैन, अल्लाह गझनफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT