Chennai Super Kings Playing 11 esakal
IPL

MI vs CSK IPL : चेन्नईच्या संघात सगळाच गोंधळ! विनिंग कॉम्बिनेशनमध्ये मोठे बदल

अनिरुद्ध संकपाळ

Chennai Super Kings Playing 11 : मुंबई इंडियन्स विरूद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला एक नाही तर दोन धक्के बसले. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे आजचा महत्वाचा सामना खेळणार नाही हे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र आता संघ जाहीर झाल्यावर दुसरा अष्टपैलू खेळाडू मोईन अली देखील आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. या दोघांच्या ऐवजी संघात अजिंक्य रहाणे आणि ड्वेन प्रेटोरियस यांना खेळण्याची संधी मिळाली आहे.

चेन्नईप्रमाणे मुंबईने देखील आपली प्लेईंग 11 ची घोषणा करताना एक धक्का दिला. आधीच जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईची सर्व भिस्त ही जोफ्रा आर्चरवर होती. मात्र तोच चेन्नई विरूद्धच्या हाय व्होल्टेज सामन्याला मुकला आहे.

मुंबईने आजच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअरच्या लिस्टमध्ये अर्जुन तेंडुलकरचे देखील नाव समाविष्ट केले आहे. त्याच्या जोडीला रमनदीप सिंग, संदीप वॉरियर, कुमार कार्तिकेय, नेहाल वधेरा यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे यापैकी कोणाला संधी मिळते हे पहावे लागेल.

चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग 11 :

डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, दीपक चाहर, मिचेल सँटनर, सिसांदा मगाला, तुषार देशपांडे

मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 :

रोहित शर्मा, इशान किशन, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, ऋतिक शोकीन, पियुष चावला, जेसॉन बेहरनडॉर्फ

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT