IPL 2024  esakal
IPL

IPL 2024 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ...? आयपीएल 2024 मधील सर्वात प्रसिद्ध संघाच्या यादीत मुंबईची झाली घसरण

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Chennai Super Kings Most Popular Team : आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. हंगामात काही संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्ज ही यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वात प्रसिद्ध टीम ठरली आहे.

चेन्नई सुपर किंग्जनंतर विराट कोहलीची आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने आतापर्यंत एक सामना हरला आहे तर एक सामना जिंकला आहे. विराट कोहलीने पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात सामना जिंकून देणारी खेळी केली.

दुसरीकडे आयपीएल सुरू होण्यापूर्वीपासूनच न्यूजमध्ये असलेली मुंबई इंडियन्स मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेली नाही. ते प्रसिद्धीच्या बाबतीत आयपीएल 2024 च्या पहिल्या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

पहिल्या तीन क्रमांकावर सीएसके, आरसीबी आणि एमआयने आपले स्थान अबाधित राखले आहे. त्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत धडाकेबाज सुरूवात करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने नंबर पटकावला आहे. पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध संघाच्या यादीत हैदराबाद चौथ्या स्थानावर पोहचली आहे.

हैदराबादने नुकतेच मुंबई इंडियन्सविरूद्ध आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या 277 धावा चोपल्या होत्या. केकेआरविरूद्ध देखील हैदराबाद जवळपास सामना जिंकली होती. मात्र शेवटच्या षटकात त्यांना पराभव सहन करावा लागला होता. हैदराबादच्या कामगिरीवर चाहते खुश आहेत.

शाहरूख खानची केकेआर आयपीएल 2024 च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्धीच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. केकेआरने आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. त्यांनी सनराईजर्स हैदराबादचा होम ग्राऊंडवर 4 धावांनी पराभव केला. आंद्रे रसेलने धडाकेबाज फलंदाजी केली तर हर्षित राणाने शेवटच्या षटकात प्रभावी मारा करत हैदराबादच्या तोंडचा घास पळवला होता. आता केकेआर आरसीबीविरूद्ध खेळणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT