CSK Reaction On Rohit Sharma  esakal
IPL

CSK Reaction On Rohit Sharma : चेन्नईनं रोहितसाठी केलं ट्विट, रितिकानं दिलेली प्रतिक्रिया सांगून गेली सर्व काही

अनिरुद्ध संकपाळ

CSK Reaction On Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित अन् मुंबईचे चाहते नाराज झाले आहेत. त्यातच आता मुंबई इंडियन्सची कट्टर प्रतिस्पर्धी टीम चेन्नई सुपर किंग्जने देखील आयपीएल इतिहासातील या सर्वात यशस्वी कर्णधाराबद्दल ट्विट केलं. यावर रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेहने दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रतिक्रियेचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

चेन्नई सुपर किंग्जने धोनी आणि रोहितचा फोटो शेअर करत त्याला समर्पित आव्हान! रोहित तुझ्याबद्दल खूप आदर असं कॅप्शन दिलं. त्यावर रितिकाने हार्टचा इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली. मात्र या हार्टचा रंग सर्व काही सांगून जात होता. रितिकाने पिवळ्या रंगाचा हार्ट शेअर केला. हा चेन्नईचा ब्रँड कलर आहे. रितिकाने मुंबई इंडियन्सचा ब्लू हा रंग न निवडता चेन्नईचा यलो रंग निवडला.

महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या सन्मानार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली त्यावेळी रितिकाने या पोस्टवर प्रतिक्रिया दिली नव्हती. यावरून जवळपास स्पष्ट होतं की रोहितकडून मुंबईची कॅप्टन्सी काढून घेणे रितिकाला आवडलेला नाही. रितिका सोडाच मुंबईच्या अनेक चाहत्यांना हा निर्णय पचनी पडलेला नाही. त्यांनी मुंबई इंडियन्सला अनफॉलो करण्या सुरूवात केली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT