Team India Cheteshwar Pujara sakal
IPL

Cheteshwar Pujara : ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा वाजवली! WTC फायनलपूर्वी पुजाराने पुन्हा ठोकले शतक

पुजाराने स्फोटक फॉर्म दाखवत 3 सामन्यात दुसरे शतक झळकावले अन्...

Kiran Mahanavar

Team India Cheteshwar Pujara : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामानंतर भारतीय क्रिकेट संघाला ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळायची आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लिश कौंटीमध्ये खेळून अंतिम सामन्याची तयारी करत आहे. या फलंदाजाने स्फोटक फॉर्म दाखवत 3 सामन्यात दुसरे शतक झळकावले आहे.

कौंटी क्रिकेटमध्ये पुजाराने तिसऱ्या सामन्यात दुसरे शतक ठोकून ऑस्ट्रेलियासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपपूर्वी धोक्याची घंटा वाजवली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना सात जूनपासून इंग्लंडमध्येच खेळला जाणार आहे. अशा स्थितीत पुजारा इंग्लिश भूमीवर अशा प्रकारे धावा काढताना पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चिंता नक्कीच वाढली असेल.

पुजाराच्या खेळीबद्दल बोलायचे झाले तर ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या या सामन्यात ससेक्सला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. याचा पुरेपूर फायदा पुजाराच्या संघाने घेतला आणि पहिला डाव 455 धावांवर घोषित केला. यादरम्यान पुजाराने ससेक्ससाठी सर्वाधिक 151 धावा केल्या, या डावात त्याने 238 चेंडूंचा सामना केला आणि 20 चौकारांसह 2 षटकारही ठोकले. पुजाराशिवाय ससेक्सच्या एकाही फलंदाजाने शतक झळकावले नाही.

ससेक्सविरुद्धच्या सामन्यात ग्लॉस्टरशायर संघ पहिल्या डावात सर्वबाद होण्यापासून एक विकेट दूर आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ग्लुसेस्टरशायरने नऊ बाद 198 धावा केल्या आहेत, तरीही ससेक्सपेक्षा 257 धावा मागे आहेत.

पुजाराने या हंगामात ससेक्ससाठी 322 धावा केल्या आहेत, तर मागील हंगाम देखील त्याच्यासाठी खूप चांगला होता. आतापर्यंत या भारतीय फलंदाजाने काउंटी क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या 11 सामन्यांमध्ये 7 शतके ठोकली आहेत. त्याच्या मागील हंगामाबद्दल बोलायचे तर पुजाराने 8 सामन्यात 1094 धावा केल्या ज्यात 3 द्विशतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : महागाईविरोधात भंडाऱ्यात शिवसेना (उबाठा)चा एल्गार; इंधन व गॅस दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन

पहिला चित्रपट सुपरहिट मग लागली फ्लॉपची लाइन; एका रात्रीत स्टार झालेली गावाकडची साध्या घरातली मुलगी; तुम्ही ओळखलंत का?

"आपण का भीक मागायची त्यांच्याकडे?" सुकन्या मोने यांनी उघड केलं हिंदी मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या..

SCROLL FOR NEXT