Deepak-Chahar-ring 
IPL

CSKच्या चहरने मैदानाबाहेर जिंकला 'रोमँटिक' सामना; पाहा Video

विराज भागवत

सर्वांच्या समोर स्टेडियममध्ये रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज

IPL 2021 CSK vs PBKS: चेन्नईच्या संघाविरूद्ध पंजाबने अवघ्या १३ षटकात सामना निकालात काढला. चेन्नईने २० षटकात ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. CSKने सामना जरी गमावला असला तरी चेन्नईच्या दीपक चहरने मात्र मैदानाबाहेर एक वेगळा सामना जिंकला. चहरने आपल्या गर्लफ्रेंडला मॅच संपल्यानंतर स्टेडियममध्ये सर्वांसमक्ष रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं. अन् तिने देखील लगेचच त्याच्या प्रपोजला होकार देत लग्नबंधनात अडकण्यासाठी होकार दिला.

दरम्यान, सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजीला सुरूवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड १२ धावांत माघारी परतला. मोईन अली (०), रॉबिन उथप्पा (२), अंबाती रायडू (४) आणि धोनी (१२) या साऱ्यांनीही वाईट कामगिरी केली. पण सलामीवीर फाफ डू प्लेसिसने एक बाजू लावून धरत दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ५५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर जाडेजा (नाबाद १५) आणि ब्राव्हो (नाबाद ४) यांनी संघाला २० षटकात ६ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारू दिली.

या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला सामना जिंकण्यासोबतच नेट रनरेटचेही आव्हान होते. त्या दृष्टीने लोकेश राहुलने डावाची सुरूवात केली. त्याने तडाखेबाज खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मयंक अग्रवाल (१२), सर्फराज खान (०), शाहरूख खान (८) आणि एडन मार्क्रम (१३) हे चौघे चांगली कामगिरी करू शकले नाहीत. पण राहुलने एक बाजूने खिंड लढवली. त्याने ४२ चेंडूत तब्बल ७ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ९८ धावा कुटल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

SCROLL FOR NEXT