CSK Mukesh Choudhary IPL Record
CSK Mukesh Choudhary IPL Record ESAKAL
IPL

MI vs CSK : भीलवाडाच्या मुकेश चौधरीने केला भीम पराक्रम

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mmubai Indians) यांच्यातील हाय व्होल्टेज ड्रामा पहिल्या षटकापासूनच उत्कंठावर्धक स्थितीत पोहचला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईने पहिल्याच षटकात मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद केले. मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) हा कधीकाळी चेन्नईचा नेट बॉलर होता. त्याने यंदाच्या हंगामात चेन्नईकडून आयपीएल पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 6 सामने खेळत 7 विकेट घेतल्या आहेत. त्यानेच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोन मुंबईच्या सलामीवीरांना शुन्यावर (Zero) बाद केले.

मुकेश चौधरीने सामन्याच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माला शुन्यावर बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. त्यानंतर त्याने याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर इशान किशनला देखील शुन्यावरच बाद करत मुंबईच्या दुसऱ्या सलामीवीराला देखील भोपळा फोडू दिला नाही. विशेष म्हणजे मुकेश चौधरी आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे दोन्ही सलामीवीर शुन्यावर बाद करण्याचा पराक्रम करणारा भारताचा पहिला आणि जागतिक स्तरावरचा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सोहेल तनवीरने 2008 मध्ये पंजाब किंग्ज विरूद्ध अशी कामगिरी केली होती. त्यानंतर 2009 च्या हंगामात रेयान हॅरिसनने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध हा करानामा केला होता. त्यानंतर आता भारताच्या मुकेश चौधरीने दोन्ही सलामीवीरांना शुन्यावर बाद करण्याचा पराक्रम केला.

मुकेश चौधरी हा मुळचा राजस्थान मधील भीलवाडाचा राहणारा आहे. तो मुंबई इंडियन्सविरूद्ध अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. मुकेशने रोहित शर्मा आणि इशान किशन बरोबरच डेवाल्ड ब्रेविसला देखील बाद करत मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने 3 षटकात 19 धावा देत 3 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT