Matheesha Pathirana | CSK | IPL 2024 Sakal
IPL

Matheesha Pathirana: 'गुडबाय...!' CSK चा स्टार गोलंदाज 17 व्या IPL हंगामातून बाहेर; भावुक पोस्ट करत मानले आभार

CSK Pacer Matheesha Pathirana: चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज मिथिशा पाथिराना आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. याबद्दल त्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

CSK Pacer Matheesha Pathirana: चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सातत्याने पहिल्या चार संघात राहण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या देखील चेन्नई प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी भक्कम दावेदार आहेत. अशातच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.

चेन्नईचा 21 वर्षीय स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना उर्वरित आयपीएल 2024 हंगामातून बाहेर झाला आहे. रविवारी (5 मे) चेन्नईने तो त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवरील पुढील उपचारासाठी मायदेशी श्रीलंकेला परत गेल्या असल्याची माहिती दिली होती. मात्र, चेन्नईने तो या हंगामात पुढे खेळणार आहे की नाही, या स्पष्ट केले नव्हते.

मात्र, अखेर पाथिरानाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत तो यंदाच्या आयपीएल हंगामातील पुढील सामन्यांसाठी चेन्नई संघासाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याचे सांगितले आहे.

पाथिरानाने पोस्ट केले की 'गुडबाय कठीण आहे, पण माझी एकच इच्छा आहे, मला चेन्नई सुपर किंग्सच्या रुममध्ये लवकरच आयपीएल 2024 ची ट्रॉफी पाहायची आहे. चेन्नईतून मिळालेल्या सर्व प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल सुपर किंग्स संघाचा मी आभारी आहे.'

पाथिराना आयपीएलमधून बाहेर जाणे चेन्नईसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्याने यंदाच्या हंगामात खेळलेल्या जवळपास सहाही सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने आयपीएल 2024 मध्ये 6 सामन्यांत 7.68 च्या इकोनॉमीने 13 विकेट्स घेतल्या आहेत.

पाथिरानाला आयपीएल 2024 मधील चेन्नईच्या सुरुवातीच्या सामन्यालाही या दुखापतीमुळे मुकावे लागले होते. तसेच तो पंजाब किंग्सविरुद्ध झालेले गेले दोन्ही सामने खेळू शकला नव्हता. अखेर आता तो संपूर्ण हंगामातूनच बाहेर झाला आहे.

त्याच्या आधी चेन्नईचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानही 1 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर आयपीएल 2024 मधून बाहेर झाला. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बांगलादेश संघात निवड झाल्याने त्याला उर्वरित आयपीएल स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. तो 1 मे रोजी झालेला सामना खेळून मायदेशी परतला.

इतकेच नाही, तर दीपक चाहरही 1 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात 2 चेंडू टाकल्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो 5 मे रोजी झालेला सामनाही खेळू शकला नाही. तो आता कधीपर्यंत फिट होईल, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

त्यामुळे चेन्नईला सध्या गोलंदाजीची चिंता असून त्यांना नव्या पर्यायांचा विचार करावा लागला आहे. तरी चेन्नईकडे वेगवान गोलंदाजीसाठी तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लिसन, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग आणि राजवर्धन हंगारगेकर असे काही पर्याय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Alandi Flood Update : आषाढी वारीपूर्वी आळंदीत पूरस्थिती, 'इंद्रायणी'ला महापूर, घाटांसह धर्मशाळा बुडाल्या; देवस्थान-पोलिसांकडून वारकऱ्यांना कडक सूचना

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार

Asia Cup 2027 Dates: आशिया चषकाच्या तारखा समोर आल्या! भारताच्या विरोधानंतरही बांगलादेशात होणार स्पर्धा

Pune Flood: इंद्रायणीला पूर, आळंदीत २५० वारकऱ्यांचे स्थलांतर; पूल पाण्याखाली... कठडे अन् चेंजिंग रूम वाहून गेल्या, दुकानांसह घरांमध्ये पाणी

SCROLL FOR NEXT