MS dhoni | Cricket News in Marathi 
IPL

IPL 2023 : हा तर अन्याय! मोईन अली नाही तर ... 'हा' खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा खरा दावेदार

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने केला विजयाचा श्री गणेशा...

Kiran Mahanavar

IPL 2023 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतारणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी यंदाच्या आयपीएलमधील विजयाचा श्री गणेशा केला. चेन्नई सुपर किंग्जने कालच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाचा 12 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्स विरुद्धचा पहिला सामना 5 विकेट्सने गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने जबरदस्त पुनरागमन केले.

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023चा मध्ये पहिला विजय नोंदवला आहे. चेन्नई सुपर किंग्जला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवून दिल्याबद्दल सीएसकेचा ऑफ-स्पिन अष्टपैलू मोईन अलीला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात मोईन अलीने गोलंदाजी करताना 4 षटकात 26 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. यासाठी मोईन अलीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात मोईन अली नव्हे तर चेन्नई सुपर किंग्जचा दुसरा खेळाडू 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता, त्या खेळाडूच्या कामगिरीकडे कोणीही लक्ष दिले नाही, तो खेळाडू नसता तर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा पराभव जवळपास निश्चित होता.

चेन्नई सुपर किंग्जच्या या खेळाडूवर अन्याय झाला. चेन्नई सुपर किंग्जला स्वबळावर जिंकून देणाऱ्या या स्टार खेळाडूची 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवड झाली नाही. चेन्नई सुपर किंग्जचा हा धडाकेबाज खेळाडू दुसरा कोणी नसून स्वतः कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध तुफानी फलंदाजी करताना 3 चेंडूत 12 महत्त्वपूर्ण धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीच्या या खेळीत दोन गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.

चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी आयपीएल 2023 च्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाचा 12 धावांच्या फरकाने पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात केलेली 12 धावांची ती अनमोल खेळी चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचे खरे कारण ठरली. महेंद्रसिंग धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटच्या षटकात 3 चेंडूत 12 महत्त्वपूर्ण धावा केल्या नसत्या तर चेन्नई सुपर किंग्जला हा सामनाही गमवावा लागला असता.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने सात विकेट गमावत 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 20 षटकांत सात गडी गमावून 205 धावाच करू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT