CSK vs MI 
IPL

CSK vs MI: ‘प्‍ले ऑफ’साठी संघांमध्ये चुरस! मुंबईला विजयाची आस; दोन पराभवांनंतर चेन्नई पुनरागमनासाठी सज्ज

रोहित शर्माच्या सेनेने राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स यांना पराभूत करून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखले आहे.

Kiran Mahanavar

Chennai Super Kings vs Mumbai Indians IPL 2023 : सर्वाधिक पाच वेळा विजयी ठरलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात चढ-उतारामधून जावे लागले आहे; मात्र मागील दोन लढतींमध्ये रोहित शर्माच्या सेनेने राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स यांना पराभूत करून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखले आहे.

मुंबई इंडियन्सला आज सलग तिसऱ्या विजयाची आस असणार आहे; मात्र त्यांच्यासमोर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असेल. मागील तीनपैकी दोन लढतींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून एक लढत पावसामुळे रद्द झाली आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा संघ विजयी पुनरागमनासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

कर्णधार रोहित शर्माला यंदाच्या मोसमात अद्याप सूर गवसला नाही. त्याला ९ लढतींमधून फक्त एका अर्धशतकासह १८४ धावा फटकावता आल्या आहेत. रोहितचा फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय असला, तरी इशान किशन (२८६ धावा), सूर्यकुमार यादव (२६७ धावा), तिलक वर्मा (२७४ धावा), कॅमेरून ग्रीन (२६६ धावा) यांच्या बॅटमधून धावाच धाव निघत आहेत. या सर्व फलंदाजांसह रोहितच्या बॅटमधूनही धावांचा पाऊस पडल्यास मुंबईसाठी ही आनंदाची बाब असणार आहे.

या बाबींवर लक्ष द्यावे लागेल

चेन्नई संघाने १० सामन्यांमधून पाचमध्ये विजय मिळवले आहेत. त्यांच्याकडे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. काही बाबींवर त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. डेव्होन कॉनवे व ॠतुराज गायकवाड हे सलामीवीर फॉर्ममध्ये आहेत. अजिंक्य रहाणे व शिवम दुबे हे मुंबईकर चेन्नईत धावाच धावा उभारत आहेत; पण मोईन अली व रवींद्र जडेजा यांना मधल्या फळीत सूर गवसलेला नाही.

तसेच गोलंदाजी विभागात तुषार देशपांडे (१७ विकेट) व रवींद्र जडेजा (१४ विकेट) यांनी चमकदार कामगिरी केली असली, तरी तुषारला धावा रोखण्याकडे भर द्यावा लागणार आहे. मथिशा पथिरना छान कामगिरी करीत आहेत. मोईन अली व माहीश तीक्षणा यांच्यापैकी एकाला वगळून मिचेल सँटनरला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजची लढत चेन्नई सुपरकिंग्स - मुंबई इंडियन्स

स्थळ - चेन्नई वेळ - दुपारी 3.30 वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

Nashik Crime : नाशिक हादरले! ४०० कोटींच्या नोटांचा कंटेनर लुटल्याप्रकरणी आता 'एसआयटी' चौकशी

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सिझनवर प्रेक्षक व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT