CSK vs PBKS Ruturaj Gaikwad And  Kagiso Rabada
CSK vs PBKS Ruturaj Gaikwad And Kagiso Rabada Sakal
IPL

CSK चा हिरो ठरतोय झिरो; पुणेकर ऋतुराजवर तिसऱ्यांदा आली ही वेळ!

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 स्पर्धेत नव्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतरही पंजाब (PBKS) विरुद्धच्या सामन्यात गत विजेत्यांनी ये रे माझ्या कॅसेट वाजवल्याचे दिसले. सलामीवीर आणि मागील हंगामात सर्वाधिक धावा करुन स्टार ठरलेल्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad ) सलग तिसऱ्या सामन्यात अपयश आले. त्याची खराब कामगिरी संघाला अडचणीत टाकणारी अशीच आहे. कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) त्याची विकेट घेतली.

पहिल्यांदा बॅटिंग करताना पंजाब किंग्जने लिविंगस्टोनच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 5 बाद 180 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड पुन्हा स्वस्तात माघारी फिरला. रबाडाच्या गोलंदाजीवर त्याने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शिखर धवनकडे सोपा झेल टिपला. त्याचा झेल टिपल्यानंतर धवनने आपल्या शैलीत शड्डू ठोकून सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

यंदाच्या हंगातील सलामीच्या लढतीत ऋतुराजला खातेही उघडता आले नव्हते. या सामन्यात चार चेंडूचा सामना करुन तो शून्यावर माघारी फिरला होता. उमेश यावनदे नितीश राणाकरवी त्याला झेलबा केले. नवख्या लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला 200 + धावा करुनही पराभव पदरी पडला होता. या सामन्यातही ऋतुराज 1 धावेवर धावबाद झाला होता. त्यामुळे सलग तिसऱ्या सामन्यात त्याच्यावर एकेरी धावसंख्येवर तंबूत परतण्याची वेळ आलीये. ही चेन्नई सुपर किंग्जसाठी धोक्याची घंटाच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT