csk vs rcb umpire removed harshal patel from bowling know what happened ipl 2023 updates 
IPL

CSK vs RCB : शेवटच्या षटकात फक्त २ बॉल टाकले अन् अंपायरने हर्षल पटेलला केले बाहेर

रोहित कणसे

CSK vs RCB IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात अशी घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 20 वे षटक हर्षल पटेलने टाकले, पण त्याला अचानक गोलंदाजी करण्यापासून रोखण्यात आले. हर्षलच्या 20व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजाने 1 धाव घेतली. त्यानंतर त्याने दुसरा चेंडू मोईन अली खेळत असताना टाकला, जो कमरेच्या वर होता (बीमर बॉल). पंचांनी त्याला नो बॉल म्हटले, त्यावर आरसीबी संघाने रिव्ह्यू घेतला, पण मैदानावरील पंचाचा निर्णय योग्य मानला गेला. मग फ्री हिटवर, सीएसकेला लेग बाय म्हणून एक धाव मिळाली. यानंतर हर्षल पटेलने वाईड बॉल टाकला.

हर्षल पटेलने तिसरा चेंडू मोईन अलीकडे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो कमरेच्या वर गेला, ज्यावर CSK संघाने DRS घेतला आणि त्याला नो बॉल घोषित केले. अशाप्रकारे, षटकात दोन नो बॉल (बीमर बॉल) टाकल्यामुळे हर्षलला गोलंदाजी करण्यापासून रोखले गेले आणि त्याच्या जागी ग्लेन मॅक्सवेलने षटक पूर्ण केले.

हर्षल पटेल सीएसकेविरुद्ध सपशेल अपयशी ठरला. त्याने 3.2 षटकात 36 धावा दिल्या आणि फक्त एक विकेट मिळाली. ते खूपच महागडा ठरला. त्याच्या बॉलिंगचा सीएसकेच्या फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला.

हर्षल पटेल 2012 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 83 सामन्यात 103 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये त्याने अप्रतिम कामगिरी करत 32 विकेट्स घेतले होते. तो स्लो बॉलवर विकेट घेण्यासाठी ओळखला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

SCROLL FOR NEXT