Dale Steyn | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: 'या' तीन ग्राऊंडवरच पहिल्यांदा होतील 300 धावा पार, डेल स्टेनचा मोठा दावा

Dale Steyn Post: आयपीएलमध्ये एकाच डावात 300 धावा कोणत्या मैदानावर सर्वात आधी होऊ शकतात, याबाबत डेल स्टेनने पोस्ट शेअर केली आहेत.

Pranali Kodre

Dale Steyn Post: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत गेल्या काही दिवसात मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत.

यंदाच्या हंगामात तब्बल तीनवेळा 250 धावांचा टप्पाही संघांनी ओलांडल्याचे पाहायला मिळाले, विशेष म्हणजे आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही या हंगामात दोनदा नोंदवली गेली. दोन्हीवेळी ही कामगिरी सनरायझर्स हैदराबादने केले.

त्याचबरोबर मंगळवारी (16 एप्रिल) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळताना सर्वाधिक 224 धावांच्या लक्ष्याचा पाठलागही केला.

एकूणच मोठ्या धावसंख्या पाहून डेल स्टेनने मंगळवारी पोस्ट शेअर करत लिहिले की एक दिवस आयपीएलमध्ये 300 धावाही होतील. याशिवाय या 300 धावा पहिल्यांदा कोणत्या तीन मैदानावर होऊ शकतात, हे देखील त्याने पोस्टमध्ये सांगितले आहे.

स्टेनने पोस्ट केले की 'बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता. कदाचीत या आयपीएलमध्ये नाही, पण जेव्हाही 300 धावा होती, त्या या तीन मैदानांपैकी एका मैदानावर सर्वात आधी होतील.'

यंदाच्या आयपीएलमध्ये बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी बरेच मोठ्या धावसंख्येचे सामने झाले आहेत. बेंगळुरूमध्ये सोमवारी (15 एप्रिल) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 287 धावा केल्या होत्या, तर त्याच्या प्रत्युत्तरादाखल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 262 धावा केल्या होत्या.

तसेच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने 234 धावाही केल्या होत्या. याशिवाय हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादने 277 धावाही केल्या होत्या, ज्यानंतर मुंबईने 246 धावांपर्यंत मजल मारली होती. याशिवाय देखील अनेकदा 200 धावांचा आकडाही यंदाच्या आयपीएलमध्ये पार झाला आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये 30 सामन्यांतच 500 षटकारही पूर्ण झाले आहेत. तसेच सहा शतके झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT