IPL 2023 CSK Deepak Chahar  
IPL

IPL 2023: मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयानंतर CSKला मोठा धक्का! दीपक चहर ४-५ सामन्यातून बाहेर

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे कारण संघाचा स्टार अष्टपैलू दीपक चहर…

Kiran Mahanavar

IPL 2023 CSK Deepak Chahar : एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू दीपक चहर किमान 4-5 सामन्यांसाठी संघाबाहेर गेला आहे. मुंबई (MI vs CSK) विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात दीपक चहरला हॅमस्ट्रिंगची समस्या आली आणि तो बाहेर गेला. दीपक चेन्नईचा मुख्य गोलंदाज आहे, अशा परिस्थितीत संघाला आगामी सामन्यांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या पुढील काही आयपीएल सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज दीपक चहरची उणीव भासू शकते. कारण त्याच्या डाव्या पायाला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे 2022च्या आयपीएलमधून बाहेर पडलेल्या चहरला शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध एक षटक टाकल्यानंतर पुन्हा तीच दुखापत जाणवली.

चेन्नईचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैना जो 'जिओ सिनेमा'साठी कॉमेंट्री करत आहे, म्हणाला, “दीपक ४-५ सामन्यांसाठी बाहेर असेल असे दिसत आहे. कारण त्याला पुन्हा हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून तो अस्वस्थ दिसत आहे. आता दीपक किती दिवसात बरा होऊन संघात परतणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वानखेडेवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने मुंबईवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या संघाने प्रथम खेळताना 8 गडी गमावून 157 धावा केल्या होत्या. विजयासाठी दिलेले 158 धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्ज संघाने 3 गडी गमावून पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT