Deepak Chahar May Return to IPL 2022
Deepak Chahar May Return to IPL 2022  esakal
IPL

चेन्नईला मोठा दिलासा; 14 कोटीची गुंतवणूक कामाला येणार

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आयपीएल 2022 च्या लिलावात आपला जुना खेळाडू दीपक चहरला (Deepak Chahar) तब्बल 14 कोटी रूपये खर्चून पुन्हा आपल्या गोटात खेचले होते. दीपक चहरने भारताकडून खेळताना गोलंदाजी तसेच फलंदाजीतही आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला 14 कोटीची मोठी गुंतवणूक वाया जाणार नाही असा विश्वास होता. मात्र आयपीएल लिलावानंतर झालेल्या वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेत तो दुखापतग्रस्त (Injury) झाला. सुरूवातीला तो संपूर्ण आयपीएल हंगामाला (IPL 2022) मुकणार अशा बातम्या आल्या. त्यामुळे चेन्नईची 14 कोटीची गुंतवणूक यंदाच्या हंगामात पाण्यात जाणार असे वाटत होते. (Deepak Chahar Injury Updates)

मात्र दीपक चहरने आपल्या लाडक्या फ्रेंचायजीला, सीएसकेला दिसाला (Relief) दिली असून तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. दीपक चहरची दुखापत गंभीर असल्याने त्याला शस्त्रक्रिया (Surgery) करून घ्यावी लागले असे वाटत होते. मात्र तो आता एप्रिलच्या मध्यापर्यंत दुखापतीतून सावरण्याची शक्यता आहे. त्याला आताच शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही असे दिसत आहे. तो सध्या एनसीए बंगळुरू येथे दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तो आठ आठवडे तेथे घालवणार आहे.

दीपक चहरचे ज्यावेळी एमआरआय स्कॅन करण्यात आला होता त्यावेळी दीपकच्या मांडीच्या स्नायूची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) पाहता दीपक चहर शस्त्रक्रिया करून घेण्यास उत्सुक नव्हता. नंतर दीपक चहरला आठ आठवड्यांचा दुखापतीतून सावरण्याचा कालावधी देण्यात आला. यामुळे चेन्नई सुपर किंग्जला दिसाला मिळाला. जर त्याने शस्त्रक्रिया करून घेतली असती तर त्याचे भारतीय टी 20 वर्ल्डकप संघातील स्थान धोक्यात आले असते.

चेन्नईने आपले मिशन IPL 2022 सुरू केले आहे. ते सध्या सुरतमध्ये आपला सराव करत आहेत. सीएसके दीपक चहरच्या दुखापतीतून सावरण्यावर लक्ष ठेवून आहे. चेन्नई सुपर किंग्ज आपला पहिला सामना 26 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT