IPL 2023 Esakal
IPL

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरची 'हुकूमशाही', या दोन निर्णयांमुळे सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा संघ कर्णधाराचा बाबतीत कायम अडचणीत येताना दिसतोय. सुरूवातीला दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली होती. मात्र त्याला दुखापत झाली अन् ही माळ ऋषभ पंतच्या गळ्यात पडली. त्याने चांगली कामगिरी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरकडून कॅप्टन्सी काढून घेत पंतला पूर्णवेळ कर्णधार केलं.

यानंतर नाराज झालेल्या श्रेयस अय्यरने फ्रेंचायजीच बदलली आता तो केकेआरचा कर्णधार आहे. मात्र यांदाच्या हंगामात ऋषभ पंत अपघातातील दुखापतींमुळे दिल्लीची कॅप्टन्सी करू शकत नाहीये. त्यामुळे दिल्लीने डेव्हिड वॉर्नरवर ही जबाबदारी टाकली. मात्र पहिल्या दोन सामन्यातच त्याने घेतलेल्या निर्णयांमुळे वाद निर्माण झाला आहे.

सनराईजर्स हैदराबादला विजेतेपद मिळवून देणारा डेव्हिड वॉर्नर दिल्लीसाठी देखील अशीच कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यांनी पहिले दोन्ही सामने गमावले. या दोन सामन्यात कर्णधार म्हणून वॉर्नरने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले.

1 - डेव्हिड वॉर्नरने रोव्हमन पॉवेलला ठेवले संघाबाहेर : वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज रोव्हमन पॉवेल हा आपल्या तडाखेबाज खेळीसाठी ओळखला जातो. मात्र तो पहिल्या सामन्यात फेल गेल्यानंतर वॉर्नरने दुसऱ्या सामन्यात त्याला थेट बाहेरचाच रस्ता दाखवला.

2 - अक्षर पटेलला गोलंदाजी न देणे : ज्या खेळपट्टीवर राशिद खानने तीन विकेट्स घेतल्या त्या खेळपट्टीवर डेव्हिड वॉर्नरने अक्षर पटेलला गोलंदाजीच दिली नाही. या निर्णयावर सर्वजण टीका करत आहेत. डेव्हिड वॉर्नरने आपण खेळपट्टी आणि परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याचे सांगितले मात्र हे उत्तर समाधानकारक वाटत नाही.

सनराईजर्स हैदराबादमध्ये देखील अशीच काहींशी परिस्थिती निर्माण झाली होती. डेव्हिड वॉर्नरने हैदराबादला आयपीएल चॅम्पियन बनवले होते. मात्र 2021 मधील हंगामात पहिल्या हाफनंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर त्याला संघातून देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर त्याने संघाच्या हॉटेलमध्येच राहणे पसंत केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT