Delhi Capitals one more Overseas player tested Corona positive esakal
IPL

DC vs PBKS : दिल्लीचा अजून एक विदेशी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) कळपातील कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. आज दिल्लीचा पंजाब सोबत सामना होणार आहे. मात्र त्यापूर्वीच दिल्लीच्या संघातील एक विदेशी खेळाडू (Overseas Player) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट (Rapid Antigen Test) पॉझिटिव्ह आली असून आरटी - पीसीआर (RT-PCR) चाचणीचा अहवाल अजून प्रलंबित आहे. हा विदेशी खेळाडू कोण याचा खुलासा अजून दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने केलेला नाही.

दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिवसेंदिवस दिल्लीच्या संघातील एक एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सुरुवातीला दिल्लीच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. संघाचे फिजिओ पॅट्रिक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना आणि मसाजरला विलगीकरणात ठेवले होते. त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती.

दरम्यान, यानंतर दिल्लीच्या संघातील सर्वांचीच पुन्हा एकदा आरटी - पीसीआर चाचणी करण्यात आली. यानंतर दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श हा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने ट्विट करून दिली होती.

दिल्लीच्या गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे संपूर्ण संघ विलगीकरणात गेला. त्यामुळे त्यांना प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे आज (दि. 20 ) पुण्यात पंजाब किंग्ज विरूद्ध होणारा दिल्लीचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर शिफ्ट करण्यात आला. आज रात्री सामना सुरू होण्यापूर्वीच अजून एक दिल्लीचा विदेशी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT