delhi capitals vs sunrisers hyderabad ipl 2024 News Marathi 
IPL

IPL 2024 DC vs SRH : आज पडणार षटकार-चौकारांचा पाऊस! प्रदीर्घ कालावधीनंतर घरच्या मैदानावर खेळणार पंत

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Match 35 IPL 2024 : फिरोजशाह कोटला या आपल्या घरच्या मैदानावर प्रदीर्घ कालावधीनंतर आज प्रथमच खेळणाऱ्या रिषभ पंतसाठी हे पुनरागमन भावनिक असणार आहे; पण दुसऱ्या बाजूला तेवढाच सक्षम आणि कठोर विचार करून झंझावाती सनरायझर्स हैदराबाद संघाला रोखावे लागणार आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 DC vs SRH : फिरोजशाह कोटला या आपल्या घरच्या मैदानावर प्रदीर्घ कालावधीनंतर आज प्रथमच खेळणाऱ्या रिषभ पंतसाठी हे पुनरागमन भावनिक असणार आहे; पण दुसऱ्या बाजूला तेवढाच सक्षम आणि कठोर विचार करून झंझावाती सनरायझर्स हैदराबाद संघाला रोखावे लागणार आहे.

कार अपघातानंतर जवळपास दीड वर्षानंतर पुनरागमन करणारा रिषभ पंत गतवर्षी कोटला मैदानावर केवळ कुबड्या घेऊन संघाचे मनोबल वाढवण्यासाठी आला होता. अथक परिश्रम आणि तंदुरुस्ती मिळवून आता तो पुन्हा दिल्ली संघाचे कर्णधारपद भुषवत आहे.

दिल्ली कॅपिटल संघासाठी हा आयपीएल मोसम संमिश्र राहिला आहे. लखनौ आणि गुजरात या संघांवर दणदणीत विजय मिळवले असले, तरी सातपैकी चार सामन्यांत पराभवाची चवही चाखावी लागलेली आहे. दुसऱ्या बाजूला विश्वविजेत्या पॅट कमिम्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा हैदराबाद संघ वेगळाच उंचीचा खेळ करत आहे. दोन सामन्यांत त्यांनी ३/२७७ आणि ३/२८७ अशी आयपीएलमधील विश्वविक्रमी धावसंख्या उभारलेली आहे. त्यामुळे पंत आणि त्याच्या दिल्लीसमोर आजच्या लढतीत आव्हान डोंगराएवढे असणार आहे.

हैदराबाद संघाचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (२३५) याने ३९ चेंडूत शतक केलेले आहे. त्याचा साथीदार अभिषेक शर्मा (२११) हासुद्धा तेवढीच आक्रमक फलंदाजी करत आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये त्यांची पॉवर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची हवाच काढत आहे. या दोघांचा स्ट्राईक रेट अनुक्रमे १९९ आणि १९७ असा आहे. त्यांच्यासमोर ईशांत शर्मा, खलिल अहमद आणि मुकेश कुमार हे वेगवान गोलंदाज कसा मारा करतात, यावर दिल्ली संघाचे भवितव्य असणार आहे.

हेड आणि अभिषक यांच्यानंतर फलंदाजीस हेन्रिक क्लासेन फलंदाजीस येतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होत आहे. सर्वोत्तम फिनिशर्स अशी ओळख असलेल्या क्लासेनकडे स्टेडियमच्या बाहेर षटकार मारण्याची क्षमता आहे.

हैदराबादच्या या झंझावाती फलंदाजांना रोखण्यासाठी दिल्लीकडे चायनामन कुलदीप यादव (६.०६ इकॉनॉमी) हे अस्त्र आहे. पंतकडे कुलदीपसह त्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल हे आणखी दोन फिरकी गोलंदाज आहे; परंतु त्यांचाही कस लागू शकतो.

दिल्ली संघाला प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसत आहे. मिचेल मार्श अगोदर स्पर्धेतून बाहेर गेला आहे. आता डेव्हिड वॉर्नरलाही दुखापत झाली आहे; परंतु संधी मिळालेल्या जॅक फ्रेसरने दोन सामन्यातून कमालीची क्षमता दाखवली आहे; तरीही पंतला जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करून संघाला आधार द्यावा लागणार आहे.

सहापैकी चार सामन्यांत विजय मिळवणाऱ्या हैदराबादसाठी त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजीची बाजू सांभाळत आहे. तो ७.८७ च्या सरासरीनेच धावा देत आहे. शिवाय मोक्याच्या क्षणी विकेटही मिळवत आहे; मात्र जयदेव उनाटकट (११.३५ सरासरी), भुवनेश्वर कुमार (१०.४५), मयांक मार्कंडे (११.२३) आणि शाहबाझ अहमद (१२.४४) यांच्याकडून अपेक्षेपेक्षा अधिक धावा दिल्या आहेत म्हणून २७७ आणि २८७ धावा उभारूनही हैदराबादला मोठे विजय मिळवता आलेले नाही. पहिल्या वेळी मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या सामन्यात बंगळूर संघाने तेवढीच तोडीस तोड फलंदाजी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT