Arshdeep Singh  
IPL

Arshdeep Singh : "स्टंप तोडा, पण..." अर्शदीपच्या गोलंदाजीवर दिल्ली पोलिसांचा इशारा!

Sandip Kapde

Arshdeep Singh : पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंग चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या 'स्टंप ब्रेकिंग' गोलंदाजीमुळे पंजाबने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आता या स्टंप तोडण्याच्या कामगिरीच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांनी ट्रॅफिक नियम पाळण्याचा इशारा दिला आहे.

दिल्ली पोलिसांनी आज (रविवार) इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोलिसांनी तुटलेल्या स्टंपचा फोटो पोस्ट केला. " स्टंप तोडा, पण ट्रॅफिक सिग्नल तोडू नका. सोबतच पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते- ट्रॅफिक सिग्नल तोडल्यानंतरच चालानचे 'बक्षीस' मिळते." असे ट्विट दिल्ली पोलिसांनी केले आहे.

यपीएल २०२३ चा ३१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ८ गडी गमावून २१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाला २० षटकांत ६ गडी गमावून २०१ धावाच करता आल्या.

मुंबईला ६ चेंडूत १६ धावांची गरज होती. पंजाबकडून अर्शदीप सिंग शेवटचे षटक टाकायला आला. यादरम्यान त्याने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर तिलक वर्मा आणि नेहल वेध्रा यांना क्लीन बोल्ड केले. या दोन विकेट्स घेताना अर्शदीपच्या चेंडूने मधल्या यष्टीचे दोन तुकडे झाले होते.

मुंबई पोलिसांनीही अर्शदीपच्या गोलंदाजीबाबत ट्विट केले आहे. एकूणच पोलिसांनी लोकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पोस्टला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लाईक्ससह शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT