dhanashree-verma-and-shreyas-iyer 
IPL

Dhanashree Verma : श्रेयस अय्यरसोबत चहलची पत्नी पार्टीत, फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर गदारोळ

Kiran Mahanavar

Dhanashree Verma Viral Photos : टीम इंडियाचा जादुई गोलंदाज युजवेंद्र चहल हा आयपीएल 2023 मधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने केवळ 3 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या.

दरम्यान युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. धनश्री वर्मा नुकतीच टीम इंडियाच्या खेळाडू श्रेयस अय्यरसोबत पार्टीमध्ये दिसली होती, त्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबतचा फोटो समोर आल्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. स्वतः धनश्री वर्मानेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. धनश्री वर्माने तिच्या मैत्रिणीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीतील फोटो शेअर केला आहे. फोटोंमध्ये श्रेयस अय्यर त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर, धनश्री आणि इतर महिलांसोबत दिसत आहे. हे फोटो व्हायरल होताच चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

युझवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांनी 3 महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये एंगेजमेंट केले, तर 22 डिसेंबर 2020 रोजी त्यांनी लग्न केले. धनश्री वर्मा डान्स कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट देखील आहे. धनश्री वर्माचे नृत्याशी संबंधित YouTube चॅनल आहे. धनश्री बॉलीवूड गाणी रिक्रिएट करते. धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते आणि युझवेंद्र चहलसोबत डान्स व्हिडिओ शेअर करत असते.

श्रेयस अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया करावी करणार आहे, ज्यामुळे तो संपूर्ण आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 चा भाग असणार नाही. अय्यरला मैदानात परतण्यासाठी किमान तीन महिने लागू शकतात. पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी तो परदेशात जाणार असून त्यानंतर त्याला प्रशिक्षणासाठी परतण्यासाठी ३ महिने लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT