RR vs PBKS IPL 2023 Live Esakal
IPL

RR vs PBKS : झुंज द्यावी तर राजस्थानच्या रॉयल्सनीच! संजू, हेटमायर अन् जुरेलने सामना आणला खेचून मात्र..

अनिरुद्ध संकपाळ

RR vs PBKS IPL 2023 Live : पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सची कडवी झुंज शेवटच्या षटकात मोडून काढत सामना 5 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच पंजाबने गुणतालिकेत मोठी उसळी घेतली.

पंजाबने ठेवलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी झुंजार खेळ केला. कर्णधार संजू सॅमसनने 42 धावा केल्या. तर युवा ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 32 धावा करून शेवटपर्यंत झुंज दिली. पंजाबकडून नॅथन एलिसने 4 तर अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या.

पंजाब किंग्जच्या 198 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. राजस्थानने जवळपास 9 धावा प्रती षटक अशी धावगती ठेवली. संघाचा कर्णधार 25 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी करत या चेसचा टोन सेट केला.

त्यानंतर रियान पराग 12 चेंडूत 20 तर देवदत्त पडिक्कलने 26 चेंडूत 21 धावांची खेळी करत आपले योगदान दिले. यानंतर इम्पॅक्ट प्लेअर ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर यांनी तुफान फटकेबाजी करत सामना 6 चेंडूत 16 धावा असा आणला. जुरेलचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. मात्र हेटमायर धावबाद झाला अन् सामना 3 चेंडूत 12 धावा असा आला.

स्ट्राईकवर युवा जुरेल होता. त्याला साथ देण्यासाठी होल्डर आला. तिसऱ्या चेंडूवर बाईज एक धाव झाली अन् सामना 2 चेंडू 11 धावा असा आला होता. स्ट्राईकवर होल्डर होता. सॅम करनच्या पाचव्या चेंडूवर होल्डरला एक धावच करता आली. अखेर शेवटच्या चेंडूवर 10 धावांची गरज असताना जुरेलने चौकार मारला. पंजाबने राजस्थानची कडवी झुंज मोडून काढत सामना 5 धावांनी जिंकला.

तत्पूर्वी, गुवाहाटी येथील राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने 20 षटकात 4 बाद 197 धावा ठोकल्या. कर्णधार शिखर धवनने आयपीएलमधील आपले 50 वे अर्धशतक पूर्ण केले.

त्याने 56 चेंडूत 86 धावांची नाबाद खेळी करत ही खेळी खास केली. शिखर आणि प्रभसिमरन सिंगने 90 धावांची सलामी दिली. यात सिंगचा 34 चेंडूत 60 धावांचे योगदान होते. यानंतर सावध सुरूवात करणाऱ्या शिखर धवनने आक्रमक फटकेबाजी केली. त्याला जितेश शर्माने 16 चेंडूत 27 धावा करत चांगली साथ दिली.

राजस्थानकडून जेनस होल्डने 2 तर अश्विन आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेत पंजाबच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शिखर धवनच्या रिव्हर्स स्विप आणि स्कूप शॉट्सने राजस्थानच्या गोलंदाजांना हैराण करून सोडले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT