Dinesh Karthik Retirement esakal
IPL

Dinesh Karthik RCB : हे खूप आव्हानात्मक आहे... पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या कार्तिकने दिले मोठे संकेत

अनिरुद्ध संकपाळ

Dinesh Karthik Retirement Hint CSK vs RCB : आयपीएलचा 17 वा हंगाम हा अनेक बदलांचा हंगाम सिद्ध होत आहे. महेंद्रसिंह धोनीने सीएसकेची कॅप्टन्सी सोडून ती ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. मुंबईचा देखील कर्णधार बदलला असून आता हार्दिक पांड्याच्या पद्धतीने एमआयचे निर्णय होणार आहेत. दरम्यान, हंगामातील पहिल्याच सामन्यात आरसीबीसाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या दिनेश कार्तिकने मोठी पत्रकार परिषदेत मोठे संकेत दिले.

दिनेश कार्तिकने गेल्या आयपीएल हंगामानंतर फक्त विजय हजारे ट्रॉफी खेळली आहे. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत समालोचन करत होता. याचवेळी तो आयपीएलची तयारी आणि सराव देखील कर होता. मात्र समालोचन आणि क्रिकेट खेळणं एकाचवेळी सुरू ठेवणं खूप कठीण आहे हे त्यानं मान्य केलं.

दिनेश कार्तिक आपले शेवटचा आयपीएल हंगाम खेळत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात आरसीबीसाठी 26 चेंडूत 38 धावांची खेळी केली. त्याने अनुज रावत सोबत सहाव्या विकेटसाठी 50 चेंडूत 95 धावांची भागीदारी रचली. यामुळे आरसीबी 173 धावांपर्यंत पोहचू शकला.

दिनेश कार्तिक म्हणाला की, 'समालोचन आणि क्रिकेटचा सराव या दोन्ही एकाचवेळी करणं खूप आव्हानात्मक आहे. या दोन्ही गोष्टी करताना मला खूप कष्ट करावे लागले. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकलो याचा मला आनंद आहे. संघासाठी धावा करणे हे कायम समाधान देतं.'

होम ग्राऊंड चेपॉकवर हा त्याचा शेवटचा सामना होता का याबाबत बोलताना कार्तिक म्हणाला की, 'मला वाटतं हे येणारा काळच सांगेल. मला वाटतं की नाही कारण गेल्या काही हंगामापासून प्ले ऑफचे गेम चेन्नईत झाले आहेत. त्यामुळे मी पुन्हा या स्टेडियमवर खेळायला येण्याची शक्यता आहे.'

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT