Dinesh Karthik MS Dhoni Six RCB vs CSK esakal
IPL

Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Dinesh Karthik MS Dhoni Six RCB vs CSK IPL 2024 : रॉयल चॅलेंजर बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव करत आयपीएल 2024 ची प्ले ऑफ फेरी गाठली. आरसीबीला चेन्नईला 18 धावांनी पराभूत करतायचं होतं. जरी चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 35 धावांची गरज होती तरी त्यांना प्ले ऑफ गाठण्यासाठी 17 धावा करणं गरजेचं होतं.

यश दयाल शेवटचं षटक टाकत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने उत्तुंग असा षटकार मारला. हा षटकार इतका उत्तुंग होता की चेंडू थेट मैदानाच्या छतावर गेला. धोनीने 110 मीटर लांब षटकार मारला. मात्र यानंतर पुढच्याच चेंडूवर धोनी बाद झाला अन् चेन्नईचे विजय सोडाच प्ले ऑफचे स्वप्न देखील भंगले.

दरम्यान, आरसीबीचा विकेटकिपर दिनेश कार्तिकने मात्र धोनीचा हा षटकार आरसीबीच्या चांगलाच पथ्यावर पडल्याचं आश्चर्यकारक वक्तव्य केलं.

सामना झाल्यावर दिनेश कार्तिक आरसीबीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर झालेल्या व्हिडिओत म्हणाला की, 'माझ्या मते आजच्या दिवसात सर्वात चांगली गोष्ट कोणती झाली असेल तर ती धोनीचा 110 मीटरचा षटकार आहे. धोनीच्या षटकारामुळं चेंडू मैदानाबाहेर गेला अन् आम्हाला नवा चेंडू मिळाला. तो गोलंदाजी करण्यासाठी चांगला चेंडू होता. आणि हो यश दयालने देखील चांगली गोलंदाजी केली.'

महेंद्रसिंह धोनी आरसीबीविरूद्धच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 13 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्याने आपल्या या छोट्याशा खेळीत तीन चौकार आणि एक षटकार मारला. त्याने सातव्या विकेटसाठी जडेजासोबत 61 धावांची भागीदारी रचली.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT