Brendon Mccullum IPL 2023  esakal
IPL

Brendon Mccullum IPL 2023 : मॅक्युलमची आयपीएलमुळं जाणार नोकरी, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सुरू केला तपास

अनिरुद्ध संकपाळ

Brendon Mccullum IPL 2023 : इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रमुख प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम हा कोलकाता नाईट रायडर्सचा देखील प्रमुख प्रशिक्षक होता. मात्र इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्विकारताना त्याने केकेआरच्या प्रमुख प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. ब्रँडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा कसोटी संघ आक्रमक क्रिकेट खेळू लागला. त्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले.

मात्र आता हाच ब्रँडन मॅक्युलम हा अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरूद्ध इंग्लंड क्रिकेट बोर्डाने चौकशी देखील सुरू केली आहे. त्याने भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन तर केलेले नाही ना याची चौकशी बोर्ड करत आहे. त्याचं झालं असं की न्यूझीलंडचा माजी कर्णधार मॅक्युलमने जानेवारी महिन्यात एक सट्टीबाजी ग्रुपचा ब्रँड अम्बेसडर झाला होता. तो यानंतर ऑनलाईन जाहिरातीत देखील झळकला होता.

मॅक्युलमने 27 मार्चला आपल्या फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो सट्टेबाजी कंपनीची जाहिरात करत होता. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड क्रिकेट बोर्ड म्हणते की, 'आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. ब्रँडन मॅक्युलम आणि सट्टेबाजी कंपनी या दोघांमधील संबंधांची सध्या चर्चा होत आहे. सट्टेबाजीविरूद्ध आमचे काही नियम आहेत. आम्ही या नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आग्रही असतो.'

मात्र इसीबीने स्पष्ट केले की सध्या मॅक्युलची चौकशी होत नाहीय. न्यूझीलंडच्या प्रॉब्लेम गँम्बलिंग फाऊंडेशनने गेल्या आठवडच्यात या जाहिरातीवीरूद्ध तक्रार केली होती. मॅक्युलम इंग्लंडचा कोच झाल्यापासून इंग्लंडने 12 कसोटी सामन्यातील 10 कसोटी सामन्यात विजय मिळवला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT