Virat Kohli Heinrich Klaasen SRH vs RCB  esakal
IPL

Virat Kohli RCB : विराटपेक्षा क्लासेनचं शतक भारी! इंग्लंडच्या माजी कर्णधारानं नाक खुपसलं

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Heinrich Klaasen SRH vs RCB : आयपीएलच्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने सनराईजर्स हैदराबादचा 8 विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 167 धावांचे आव्हान ठेवले होते. यात हेन्रिच क्लासेनच्या दमदार 104 धावांच्या शतकी खेळीचा मोठा वाटा होता. यानंतर हे आव्हान आरसीबीने 20 व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावा ठोकत आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने फाफ ड्युप्लेसिससोबत 172 धावांची तगडी सलामी दिली. ड्युप्लेसिसने 71 धावांचे योगदान दिले.

दरम्यान, या सामन्यात क्लासेन आणि विराट कोहलीचे अशी दोन शतके झाली. दोघांनीही झुंजार शतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र विराटचा हा प्रयत्न यशस्वी ठरला तर क्लासेनचे 51 चेंडूत ठोकलेल्या 104 धावा वाया गेल्या. सामना झाल्यानंतर या दोन्ही शतकवीरांपैकी कोणत्या शतकवीराचे शतक भारी होते अशी चर्चा सुरू झाली. यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने विराट कोहलीच्या शतकापेक्षा क्लासेनचे शतक जास्त भारी होते असे मत व्यक्त केले.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना केविन पिटरसन म्हणाला की, 'मी एक जास्त प्रसिद्ध नसलेला विचार मांडतो. या दोघांपौकी हेन्रिच क्लासेनचे शतक चांगले होते. विराटपेक्षा क्लासेनची इनिंग चांगली होती. तुम्ही विचार करा की जो संघ आधीच बाहेर पडला आहे. त्या संघाचा भाग असणं आणि संघातील इतर खेळाडूंकडून फारशी साथ न लाभणं. जो संघ फारसा क्रियाशील नाही अशा संघासाठी कामगिरी करणं हे कौतुकास पात्र असतं. क्लासेन ज्या प्रकारे खेळला ते जबरदस्त होतं.'

हेन्री क्लासेनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 51 चेंडूत 104 धावा ठोकल्या. सनराईजर्स हौदराबादने केलेल्या 186 धावांमध्ये एकट्या क्लासेनने 104 धावा ठोकल्या होत्या. सनराईजर्स हौदराबादची अवस्था 2 बाद 28 अशी झाली होती. त्यानंतर क्लासेनने एकहाती डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

हैदराबादच्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी 172 धावांची दमदार सलामी दिली. यात सलामीला आलेल्या विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावा ठोकल्या. त्याला फाफ ड्युप्लेसिसलने 71 धावा करून चांगली साथ दिली होती. या दोघांच्या मोठ्या भागीदारीनंतरही हैदराबादने सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. अखेर आरसीबीने 4 चेंडू राखून सामना जिंकत आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT