Evin Lewis One Handed Catch Leads Lucknow Super Giants to Qualify IPL 2022 Paly Off
Evin Lewis One Handed Catch Leads Lucknow Super Giants to Qualify IPL 2022 Paly Off  esakal
IPL

KKR vs LSG : लुईसने लखनौला 'हात' दिला; कष्टाळू रिंकूची झुंज गेली वाया

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर लखनौ सुपर जायंटने कोलकाता नाईट रायडर्सवर 2 धावांनी निसटता विजय मिळवला. लखनौने आजचा सामना जिंकल्याने प्लॅ ऑफसाठी क्वलिफाय झाली. शेवटच्या षटकात 21 धावांची गरज असताना रिंकू सिंह आणि सुनिल नारायणने 18 धावांपर्यंत मजल मरली. मात्र सामना 2 चेंडूत 3 धावा असा असताना स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर लुईसने एका हातात रिंकूचा अप्रतिम झेल पकडला आणि सामन्याला कलाटनी मिळाली. रिंकून 15 चेंडूत 40 तर 7 चेंडूत 21 धावा केल्या. त्यापूर्वी श्रेयस अय्यरने 50 तर नितीश राणाने 42 धावांची खेळी केली. लखनौकडून स्टॉयनिसने 3 तर मोहसीन खानने 3 बळी टिपले. लखनौकडून क्विंटन डिकॉकने 140 धावा केल्या तर कर्णधार राहुलने 68 धावांची नाबाद खेळी केली. या दोघांनी 210 धावांची नाबाद सलामी दिली. (Evin Lewis One Handed Catch Leads Lucknow Super Giants to Qualify IPL 2022 Paly Off)

लखनौने ठेवलेले 211 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब झाली. व्यंकटेश अय्यर पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्याला मोहसीन खानने बाद केले. त्यानंतर अजिंक्यच्या जागी आलेला अभिजीत तोमर (4) देखील मोहसीन खानची शिकार झाला. केकेआरचे सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर नितीश राणा आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावण्यास सुरूवात केली. नितीश राणाने आक्रमक फलंदाजी करत 22 चेंडूत 42 धावा केल्या मात्र कृष्णाप्पा गौतमने त्याला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयस अय्यर देखील स्टॉयनिसच्या 50 धावा करून बाद झाला. बिलिंग्जची 36 धावांची खेळी रवी बिश्नोईने संपवली.

संघ अडचणीत असताना केकेआरचा हुकमी एक्का आंद्रे रसेल 11 चेंडूत 5 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला मोहसीन खानने बाद केले. केकेआरच्या पाठोपाठ विकेट पडल्यानंतर ते सामना हरणार असे वाटत होते. मात्र रिंकू सिंह आणि सुनिल नारायणने शेवटच्या चार षटकात तुफान फटकेबाजी केली. त्यांनी शेवटच्या सामन्यात 21 धावांची गरज असताना 18 धावा करत सामना दोन चेंडूत 3 धावा अशी आणली. मात्र पाचव्या चेंडूवर 15 चेंडूत 40 धावा करणारा रिंकू सिंह झेलबाद झाला. स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर लईसने एका हातात झेल घेत सामन्याचे पारडे फिरवले. अखेर स्टॉयनिसने शेवटच्या चेंडूवर उमेश यादवचा त्रिफळा उडवत सामना अवघ्या 2 धावांनी जिंकला.

लखनौ सुपर जांयट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या क्विंटन डिकॉक आणि केएल राहुलने पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिसऱ्याच षटकात क्विंटन डिकॉकचा उमेश यादवच्या गोलंदाजीवर त्याचा झेल थर्ड मॅनला उभा असणाऱ्या अभिजीत तोमरकडे गेला मात्र त्याने झेल सोडला.

हे जीवनदान केकेआरला फार महागात पडले. त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि केएल राहुलने पॉवर प्लेमध्ये लखनौला चाळीशी पार करून दिली. त्यानंतर डिकॉकने मागे वळून पाहिले नाही त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आपले शतक 59 चेंडूत पार केले. दुसऱ्या बाजूला केएल राहुल सावध फलंदाजी करत त्याला साथ देत होता. त्याने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी लखनौला नाबाद 210 धावांपर्यंत पोहचवले. क्विंटन डिकॉकने नाबाद 140 धावा केल्या. केएल राहुलने 51 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT