IPL

RCB च्या कर्णधाराने मॅचपूर्वी मला मेसेज केला होता...' टीम डेव्हिडचा खुलासा

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्नही भंगले

Kiran Mahanavar

आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सने विजयासह आपला प्रवास संपवला. मुंबईने शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्नही भंगले. मुंबईच्या विजयाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला झाला. आणि सामन्याचा विजयाचा हिरो ठरला मुंबईचा टीम डेव्हिड. ज्याने 11 चेंडूत 34 धावा करत 4 षटकार मारले.

टीम डेव्हिडने सामना संपल्यानंतर एक मोठा खुलासा केला आहे. टीम डेव्हिड म्हणाला की, आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने मला मेसेज केला होता. या मेसेजमध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफचे फोटो होते. तिघांनीही मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी एमआय टीमच्या जर्सी घेतले होते. आणि त्या खाली लिहिले होते, विजयाने सीझन संपवणं हा एक चांगला अनुभव आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीला केवळ 159 धावांवरच करता आल्या. रोव्हमन पॉवेलने 34 चेंडूत 43 तर ऋषभ पंतने 33 चेंडूत 39 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 3 आणि रमणदीप सिंगने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात मुंबई संघाने 5 चेंडू बाकी असताना 160 धावा करत हा सामना 5 गडी राखून जिंकला. सलामीवीर ईशान किशनने 35 चेंडूत 48 धावा, डेवाल्ड ब्रेव्हिसने 33 चेंडूत 37 आणि टीम डेव्हिडने 11 चेंडूत 34 धावा करत सामना जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT