Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals  esakal
IPL

RCB vs RR : ड्युप्लेसिस - मॅक्सवेलची शतकी भागीदारी तरी RCB ला राजस्थानने रोखले 200 च्या आत

अनिरुद्ध संकपाळ

Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals : प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने खराब सुरूवातीनंतर 15 षटकात 156 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याचवेळी आरसीबी 200 पार धावसंख्या उभारेल असे वाटत होते. मात्र राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात आरसीबीचे 4 फलंदाज बाद करत त्यांना 189 धावात रोखले.

आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (77) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी रचली. राजस्तानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर यशस्वी जैसवालने दोन धावबाद केले. आजच्या सामन्यात आरसीबीचे तीन फलंदाज धावबाद झाले.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आरसीबीला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का दिला. ट्रेंट बोल्टने कर्णधार विराट कोहलीचा पायचीत बाद केले. आपल्या पहिल्याच षटकात विराट कोहलीला बाद करणाऱ्या बोल्टने दुसऱ्या षटकात शाहबाज अहमदला बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

पॉवर प्लेच्या सुरूवातीलाच दोन धक्के बसलेल्या आरसीबीला फाफ ड्युप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सावरले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 80 धावांची भागीदारी रचत संघाला 10 षटकात 101 धावांपर्यंत पोहचवले. आक्रमक मॅक्सनेलने 27 चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकले. तर ड्युप्लेसिसने देखील 26 चेंडूत 40 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

मॅक्सवेलनंतर फाफ ड्युप्लेसिसनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची शतकी भागीदारी रचली. मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या नादात फाफ ड्युप्लेसिस 62 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर 44 चेंडूत 77 धावा ठोकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला अश्विनने बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

मॅक्सवेल आणि ड्युप्लेसिस बाद झाल्यानंतर चहलने महिपाल लोमरोरला 8 धावांवर बाद केले. तर सुरेश प्रभुदेसाई शुन्यावर धावबाद झाला. त्यामुळे आता दिनेश कार्तिक आणि वानिंदु हसरंगावर शेवटच्या तीन षटकात धावांची गती वाढवण्याची जबाबदारी होती. मात्र हसरंगा 6 तर दिनेश कार्तिक 16 धावा करून बाद झाला.

शेवटचे षटक टाकणाऱ्या संदीप शर्माने दिनेश कार्तिक विजयकुमार विशाखला पाठोपाठ बाद केले. मात्र डेव्हिड विलीने पाचव्या चेंडूवर चौकार मारत आरसीबीला 20 षटकात 9 बाद 189 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT