Glenn Maxwell | IPL 2024 | RCB vs LSG Sakal
IPL

IPL 2024: मयंक यादवच्या गतीपुढं मॅक्सवेलही पडला फिका; भोपळाही फोडता न आल्याने नावावर झाला नकोसा विक्रम

Glenn Maxwell: लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल शुन्यावर बाद झाल्याने त्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

Pranali Kodre

Glenn Maxwell IPL: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मंगळवारी (2 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियवर सामना झाला. हा सामना लखनऊने दोन चेंडू राखून 28 धावांनी जिंकला.

दरम्यान, या सामन्यात बेंगळुरूचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

या सामन्यात लखनऊने बेंगळुरूसमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डू प्लेसिस सहाव्या षटकात धावबाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर मॅक्सवेल फलंदाजीला उतरला होता.

मात्र या षटकात मयंकने टाकलेल्या साधारण ताशी 151 किमी वेगात टाकलेल्या चौथ्या चेंडूचा सामना करताना मॅक्सवेल झेलबाद झाला. त्याचा झेल निकोलस पूरनने घेतला. मॅक्सवेलला भोपळाही फोडता आला नाही.

दरम्यान आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची मॅक्सवेलची ही 16 वी वेळ आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मॅक्सवेल आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

त्याने मनदीप सिंग, पीयुष चावला आणि सुनील नारायण यांना मागे टाकले आहे. हे तिघेही आयपीएलमध्ये प्रत्येकी 15 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

दरम्यान, या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. रोहित आणि कार्तिक दोघेही आयपीएलमध्ये प्रत्येकी १७ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूला 19.4 षटकात सर्वबाद 153 धावाच करता आल्या. बेंगळुरूकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. त्याने 13 चेंडूत ही खेळी करताना 3 चौकार आणि 3 षटकार मारले.

तसेच रजत पाटीदारने 29 धावा केल्या, तर विराट कोहलीने 22 धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. लखनऊकडून मयंक यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 181 धावा केल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 56 चेंडूत 81 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 5 षटकार मारले.

तसेच निकोलस पूरनने 21 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांसह 40 धावांची नाबाद खेळी केली. बेंगलोरकडून गोलंदाजीत मॅक्सवेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक सुरू

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT