GT vs MI IPL 2023  esakal
IPL

GT vs MI IPL 2023 : हार्दिक रोहितवर पडला भारी, गुजरातनं पहिल्यांदाच मुंबईला पाजलं पाणी

अनिरुद्ध संकपाळ

GT vs MI IPL 2023 : गुजरातने विजयासाठी ठेवलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईचा तब्बल 55 धावांनी पराभव झाला. गुजरातकडून नूर अहमद (3 विकेट) आणि राशिद खान (2 विकेट) यांनी भेदक मारा केला. मुंबईकडून नेहल वधेराने सर्वाधिक 40 धावा केल्या. विशेष म्हणजे गुजरातने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मुंबईला पराभवाची धूळ चारली. गुजरातचे आता 7 सामन्यात 5 विजयासह 10 गुण झाले आहेत. ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचले असून आता त्यांच्या रडारवर चेन्नई सुपर किंग्ज आहे.

गुजरातचे 208 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरूवात अडखळती झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या दमदार माऱ्यासमोर रोहित शर्मा आणि इशान किशन चाचपडताना दिसले. याचा फायदा घेत हार्दिक पांड्याने रोहित शर्माला 2 धावांवर बाद केले. रोहित बाद झाल्यानंतर इशान किशनला काही केल्या पॉवर प्लेमध्ये मुंबईची धावगती वाढवता येत नव्हती. दुसऱ्या बाजूने ग्रीनला देखील गुजरातच्या गोलंदाजांनी जखडून ठवले होते.

अखेर 21 चेंडूतील 13 धावांची इशान किशनची संथ खेळी राशिद खानने संपवली. त्यानंतर राशिदने तिलक वर्माची देखील 2 धावांवर शिकार केली. पाठोपाठ नूर अहदमने 26 चेंडूत 33 धावा करणाऱ्या कॅमरून ग्रीनचा देखील अडथळा दूर केला. त्यानंतर नूरने टीम डेव्हिडला भोपळा देखील फोडू दिला नाही.

मुंबईची अवस्था 5 बाद 59 अशी झाली असताना सूर्यकुमार यादव आणि नेहल वधेरा यांनी सहाव्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी नूर अहमदने फोडली. त्याने 12 चेंडूत 23 धावा करणाऱ्या सूर्याला माघारी धाडले. यानंतर नेहलने तळातील फलंदाजांना घेऊन झुंज देण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो देखील 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अर्जुन तेंडुलकरने 9 चेंडूत 13 धावा करत मुंबईला 150 च्या पार पोहचवले. मात्र शेवटच्या षटकात दो देखील बाद झाला. अखेर मुंबईचा डाव 20 षटकात 9 बाद 152 धावांवर थांबला.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ज विरूद्ध जी चूक केली होती. तीच चूक गुजरात टायटन्स विरूद्ध देखील केली. गोलंदाजी करताना पहिल्या 15 षटकात धावांवर अंकुश ठेवला. मात्र शेवटच्या 5 षटकात धावांची लयलूट केली. आजच्या सामन्यात देखील मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या 5 षटकात 77 धावा दिल्या. यामुळे पुन्हा एकदा रोहित सेनेला 207 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.

गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अभिनव मनोहरने 21 चेंडूत 42 धावा, राहुल तेवतियाने 5 चेंडूत 20 तर डेव्हिड मिलरने 22 चेंडूत 46 धावा ठोकल्या. मुंबईकडून पियुष चावलाने 34 धावात 2 बळी टिलले.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT