GT vs MI IPL 2023 Head To Head  esakal
IPL

GT vs MI IPL 2023 : गुजरात फक्त मुंबईलाच असते टरकून; हेड टू हेडमध्ये रोहितच बाप

अनिरुद्ध संकपाळ

GT vs MI IPL 2023 Head To Head : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गतविजेते गुजरात टायटन्स आणि सर्वाधिकवेळा आयपीएल जिंकणारी टीम मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरातसमोर रोहितच्या मुंबई पल्टनचे कडवे आव्हान असणार आहे.

मुंबईने हार्दिक पांड्याचा भाऊ आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वातील लखनौचा 81 धावांनी पराभव करत क्वालिफायरसाठी क्वालिफाय केले. त्यामुळे गुजरातने मुंबईला हलक्यात घेऊन चालणार नाही. दुसरं म्हणजे हेड टू हेडमध्येही मुंबई गुजरातसाठी डोकेदुखीच आहे.

GT vs MI हेड टू हेड

गेल्या वर्षी पदार्पणाचा हंगाम खेळणाऱ्या गुजरात आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. यात रोहितच्या नेतृत्वातील मुंबईने दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला फक्त 1 सामना जिंकता आला आहे. गुजरात ही आयपीएलमधील सर्वात चांगली चेस करणारी टीम म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईसमोर या संघानेही चेस करताना नांगी टाकली होती. या हंगामात चेस करताना गुजरात मुंबईविरूद्ध हरली होती.

गुजरातला सूर्याचा धसका

गुजरात टायटन्ससाठी अफगाणिस्तानचा राशिद खान हा मधल्या षटकात चांगलाच प्रभावी ठरतोय. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव राशिद खानसमोर कशी फलंदाजी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राशिदने रोहितला आयपीएलमधील सहा डावात 4 वेळा बाद केले आहे. मात्र राशिद खानला सूर्यकुमार यादवला बाद करण्यात अपयश आले आहे. सूर्याने गेल्या सामन्यात गुजरातविरूद्ध 47 चेंडूत 67 धावा ठोकल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT